
कोल्हापूर: १३व्या जे.के.टायर्स राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी यंदा कोल्हापुरात होत आहे.या अंतिम फेरीत विष्णू आणि रिकी यांना चांगली टक्कर देण्यासाठी स्थानिक स्पर्धक ध्रुव मोहिते सज्ज झाला आहे.उद्या मोहितेज रेसिंग अकादमी येथे सराव आणि २५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी होणार आहे.सद्यस्थितीत विष्णुप्रसाद ३२८ आणि रिकी डॉनीसन ३२४ गुणांवर आहे.पण आपल्या ड्रायविंग कौशल्याने तयार झालेला स्थानिक खेळाडू १६ वर्षीय ध्रुव मोहिते कोल्हापूरचे नाव नक्कीच मोठे करेल अशी अपेक्षा आहे.जेके मोटो स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय शर्मा म्हणाले की यावेळच्या फेरीत या तीन स्पर्धकांना ३१३ गुणावर असलेला नयन चटर्जी चांगली मात देऊ शकतो.तसेच १३ ते १६ वयोगटातील कनिष्ट मॅक्स गटात फारीदाबादचा मानव शर्मा, बंगळूरचा यश आराध्येयांच्यात चुरशीची लढत होईल.मायक्रो मॅक्स श्रेणीत 7 ते १२ वयोगटातील शहान आली याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मेकोचा अर्जुन नायर आणि बयारल आर्टचा रुहान अल्वा एक रन देईल अशी अशा वाटते.कोल्हापुरात अश्या प्रकारच्या राष्ट्रीय मोटो स्पोर्ट्सच्या स्पर्धा होणे ही अभिमानाची गोष्ट आहे असे मोहिते इंडस्ट्रीजचे एम.डी अभिषेक मोहिते यांनी सांगितले. पाऊस जरी आला तरी त्याला मात देण्यासाठी हे सर्व खेळाडू स्पर्धक तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply