
कोल्हापूर: १३व्या जे.के.टायर्स राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स चॅम्पियानशीप स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात आज पार पडली अत्यंत चुरशीची लढत आणि मोटोरेसिंगचा थरार कोल्हापुरकारां अनुभवायला मिळाला.मोहितेज रेसिंग अकादमी येथे ही स्पर्धा पार पडली.तीन गटात या लढती पार पडल्या.पण त्यातील सिनिअर मक्स गटात कोल्हापूरचा ध्रुव मोहिते आणि चेन्नईचा स्पर्धक विष्णू मोहिते यांच्यात अत्यंत चुरस निर्माण झाली होती.काळजाचा ठोका चुकविणारी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची ठरली.अचानक ध्रुव मोहिते याचा किरकोळ अपघात झाला यामुळे ध्रुवला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.याची अंतिम फेरी हैद्राबाद येथे पार पडणार होती पण लोकांच्या प्रतिसादामुळे ही स्पर्धा कोल्हापुरात घेण्यात आली होती.अवघ्या 7 वयोगटातील स्पर्धकही सहभागी झाले होते.या स्पर्धेत मायक्रो मॅक्स गटात रुहान अल्वा विजेता दुसऱ्या स्थानावर शहान मोहसिन तर तिसऱ्या स्थानावर अर्जुन नायर, ज्युनियर मॅक्स गटात मानव शर्मा विजेता दुसऱ्या स्थानावर चिराग घोरपड़े तर तिसऱ्या स्थानावर जॉनथन कुरिओकोसे, सिनियर मॅक्स गटात रिकी डोनिसन विजेता दुसऱ्या स्थानावर नयन चटर्जी तर तिसऱ्या स्थानावर मृणाल चटर्जी यांनी स्पर्धा जिंकाली.अंतरराष्ट्रीय दर्जची स्पर्धा कोल्हापुरात पार पडणे हे कोल्हापुरचे भाग्य आहे असे मोहितेज इंडस्ट्रीजचे एम्.डी अभिषेक मोहिते यांनी सांगितले.
Leave a Reply