घंटा’ चा येत्या १४ आक्टोंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर घणघणाट

 

img-20160927-wa0005पुणे :सध्या अवघ्या तरुणाईमध्ये आणि जाणकार प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे,ती घंटा चित्रपटाचा ट्रेलर,टीझर आणि गाण्यांची.या दणकेबाज प्रमोशनने चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढविली आहे.हाच घंटा चित्रपट येत्या १४ आक्टोंबर रोजी येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला.चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी महेश मांजरेकर,जितेंद्र जोशी,अमृता खानविलकर यांनी घंटा मध्ये प्रमुख भूमिका करणारे अमेय वाघ,सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्या भूमिकेचे कौतुक केले आणि चित्रपटाच्या गाण्यांना आपली पसंती मनापासून दर्शविली.तरुणाईचा विषयावरचा धमाल चित्रपट म्हणून याची सर्वत्र चर्चा आहे.याच्या यु ट्यूब ट्रेलरला लाखोंच्या घरात हिट्स मिळाल्या आहेत.अमेय,सक्षम आणि आरोह या तरुण कलाकारांबद्दल तरुणांमध्ये क्रेझ आहे.या त्रीकुटांच्या उचापती आणि मुंबईत स्ट्रगल करत असलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात याचे खुमासदार चित्रण दिग्दर्शक शैलेश काळे यांनी यात केले आहे.फक्त तरुण वर्गासाठीच नाही तर समाजातल्या प्रत्येकाने पाहावा असाच हा चित्रपट आहे आणि सुमित बोनकर,राहुल यशोद यांनी हटके असे कथानक लिहले आहे.दशमी स्टुडीओज,ब्रह्मपुरा पिक्चर्स आणि यलो इन्कारपोरेशन यांनी हा चित्रपट सादर केला आहे.टीव्हीवरील एकापेक्षा एक हित सिरिअल्स नंतर ही टीम चित्रपट क्षेत्रात आपला पाया या चित्रपटाच्या रूपाने भक्कम करू पहात आहे.फ्रेश लुक,दमदार कथानक,धमाल प्रेझेन्टेशन आणि साच्याच्या बाहेर,चाकोरीबद्ध नसणारा पण वेगळा विषय हाताळल्याने हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टिमने आज प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!