
सांगली: राज्याभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ आज-मंगळवारी सांगलीत येऊन धडकले. जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव आणि भगिनी सांगलीत दाखल झाल्याने शहरात मराठ्यांची महालाट आली होती. कोपार्डी बलात्कारप्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात खासदार संजय पाटील, आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार जयंत पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबार आदींसह मराठा समाजातील नेतेही सहभागी झाले होते.
Leave a Reply