
पोलीस क्रीडा स्पर्धेत महिला गटात करवीर विभागास
पुरुष गटात मुख्यालय विभागास सर्वसाधारण विजेतेपद
कोल्हापूर : 44 व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा सांगता समारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांच्या हस्त महिला गटात करवीर विभागाने तर पुरुष गटात मुख्यालय विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 26 सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये मुख्यालय, शहर, करवीर, गडहिंग्लज/ शाहुवाडी, व जयसिंगपूर/इचलकरंजी या 5 विभागातील 150 खेळाडूंनी भाग घेतला होता.
पोलीस मुख्यालयाच्या अलंकार सभागृहाच्या मैदानावर 44 व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा बक्षीसांचे वितरण समारंभ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, कागलच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर, गृह विभागाचे उप अधीक्षक सतीश माने, शहर विभागाचे उप अधीक्षक भारतकुमार राणे, शाहूवाडी विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी आर. एम. सरोदे, इचलकरंजी विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी विनायक नरळे, तसेच आर. आर. पाटील, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक एन. एच. भुजबळ, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ आदिजणांची प्रमुख उपस्थिती होती.
करवीर विभागातून महिला गटास तर मुख्यालय विभागातून पुरुष गटास सर्वसाधारण विजेतेपदाची ढाल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. अन्य विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. विजेते संघ पुढीलप्रमाणे मुख्यालय विभाग हॉकी पुरुष, शहर विभाग फुटबॉल पुरुष, करवीर विभाग बास्केटबॉल पुरुष, गडहिंग्लज/शाहुवाडी व्हॉलीबॉल पुरुष, जयसिंगपूर/इचलकरंजी खो खो पुरुष, मुख्यालय विभाग कबड्डी पुरुष, हॅन्डबॉल पुरुष, कबड्डी महिला, करवीर विभाग, व्हॉलीबॉल महिला, बास्केटबॉल महिला, जयसिंगपूर/इचलकरंजी विभाग खो खो महिला, शहर विभाग ऍ़थलेटिक्स चॅम्पियनशीप पुरुष, जयसिंगपूर/इचलकरंजी विभाग क्रॉसकंट्री महिला व पुरुष चॅम्पियनशीप. तसेच मुख्यालय विभागातून सोनाली देसाई हीने तर करवीर विभागातून निलेश देसाई यांने बेस्ट ऍ़थलेटीक्स प्रकारात प्राविण्य मिळविले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे म्हणाले, सांघीक भावना खेळामुळे निर्माण होते. पोलीस विभागाच्या विजेत्या संघांमधून राज्य व राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू निर्माण होतील असे सांगून खेळाडूंचे अभिनंदन केले.
पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी नागरिक स्त्री-पुरुष, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी गृह विभागाचे उप अधीक्षक सतीश माने यांनी आभार मानले.
Leave a Reply