कलाकार,रासिकांच्या दातृत्वाने भारावली संगीत मैफिल

 

कोल्हापुर :कलाकार आणि रसिकांच्या दातृत्वाने भारावलेली “संगीत मैफिल”मानधनाच्या पाकिटाची देव-घेव नाही, श्रेष्ठ- कनिष्ठ, श्रीमंती-गरिबी असा भेदभाव नाही, garaju-vidyarthi-aaditi-salavi-jafar-shikalgar-yana-arthik-nidhi-pradan-karatana-sanjivani-dalavi-davikadun-pratidnyache-nandakumar-kalyankar-manoj-joshi-anant-kulkarni-shivaji-patil-prakवाद्यांच्या आणि गायनाच्या सोबतीला होते तरल मानवतेचे कोंदण.. निमित्त होते प्रतिज्ञा संस्थेच्या स्नेहरंग आणि स्वररंग उपक्रमा अंतर्गत कु.आदिती रमेश साळवी आणि जाफर फिरोज शिकलगार या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी संकलनार्थ वादन- गायन संगीत मैफिलीचे… या दोन विद्यार्थ्यांना स्नेहरंग तर्फे दहा हजार रुपयांचा निधी संजीवनी दळवी आणि अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेतर्फे गेल्या काही वर्षांपासून कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन निरनिराळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमातून जमा होणारा निधी हा समाजातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी तसेच गरीब रुग्णांसाठी उपयोगात आणला जातो.. प्रतिज्ञाने या वर्षी सात गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांना बाचणी येथील दिशा अकॅडमी या निवासी शाळेत दाखल केले आहे.. शाळेचे संचालक अजित पाटील यांनीही प्रतिसाद देत प्रवेश शुल्कात पन्नास टक्के सवलत दिली आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाहू स्मारक भवन येथे मॅजिक ऑफ इंस्टरूमेंटल मूड्स या वाद्यवृंद आणि मेरी आवाजही पहचान है या जुन्या अविट हिंदी गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. मॅजिक ऑफ इंस्टरुमेंटल मूड्स साकारताना शिवाजी कदम यांनी ट्रंपेट वर “सूर निरागस हो”, “चुरा लिया है तुमने जो दिल को” या गीतांवर तर ज्येष्ठ वादक प्रकाश साळोखे यांनी  सॅक्सोफोन, ट्रम्पेट आणि सुफ्रानो या वाद्यांवर  “इस मोड पे आते है”,”होठोंपे ऐसी बात ” ही गाणी सादर करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांना ठेका धरण्यास भाग पाडले. “जाने जा ढुंढता फिर रहा” हे युगुलगीत या दोन्ही वादकांनी ट्रम्पेट वर सादर केले. तसेच या दोघांनी ट्रमपेट,सॅक्सोफोन आणि सुफ्रानो या तिन वाद्यांचे थिम बेस ” कॉम्पिटिशन ” सादर केली. ”आजा आजा मै हु प्यार तेरा” या प्रकाश साळोखे यांनी सॅक्सोफोन वर सादर केलेल्या गाण्याला तर रसिकांनी अक्षरष:  डोक्यावर घेतले. या वाद्यवृंदात तबला साथ रोहन पवार (सातारा) , ढोलक-ढोलकी साथ स्वप्नील साळोखे, गिटार साथ स्वप्नील साळोखे, कि-बोर्ड वर गणेश साळोखे, कोंगो वर निलेश साळोखे, साइड रिदम ला संजय करवडे आणि अक्टोपॅड साथ मनोज जोशी यांनी दिली. अमेरिकेतल्या रसिकश्रोत्यांना वेड लावलेल्या ऑर्केस्ट्रा सेव्हन मेलोडीज च्या वादक कलाकारांचा समावेश असलेल्या  या मैफिलीचे संगीत संयोजन गणेश साळोखे आणि मनोज जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!