प्रश्नांना हसत-खेळत सामोरा जाणारा ‘फॅमिली कट्टा’

 
कोल्हापुर :अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी निर्मिती केलेल्या आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र बघायला मिळणार आहेत. एक जबरदस्त कौटुंबिक कथा असलेला हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबरला हा सिनेमा महाराष्ट्रासह परदेशातही रिलीज होणार आहे. आज एखादा सोहळा ‘साजरा’ करायला आपण अनेक निमित्त शोधतो पण त्यामुळे आपल्यातले नातेसंबंध दृढ व्हायला खरोखरच मदत होतेये का? की ती फक्त तात्पुरत्या आनंदाची लयलुट होते? आज एकीकडे सोशल मिडियामुळे खूप ‘कनेक्ट’ झाल्यासारखं वाटतं तर दुसरीकए माणसांची ‘बेटं’ होणं मात्र का थांबत नाही? आपली कुटुंब व्यवस्था बदलतेय म्हणजे आपण त्याला काही नवा अर्थ देतोय की काही गमावतोत? या सगळ्या प्रश्नांना हसत-खेळत सामोरा जाणारा नवा सिनेमा म्हणजे ‘फॅमिली कट्टा’ वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळक, प्रतिक्षा लोणकर, किरण करमरकर, सुलेखा तळवलकर, सचिन देशपांडे, सई ताम्हणकर,दिवंगत संगीतकार आदेश श्रीवास्तव, संजय खापरे, गौरी नलावडे, आलोक राजवाडे या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख्य भूमिका आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचं लेखन प्रशांत दळवी यांनी केलंय. तर सिनेमाची
सिनेमटोग्राफी महेश लिमये यांनी केलीये. तर सिनेमाचं संगीत-पार्श्वसंगीत हे मंगेश धाकडे यांनी आणि गीते लिहिली आहेत दासू वैद्य यांनी.संपूर्ण कुटुंबला भावेल असा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या टिमने व्यक्त केला.family-katta-2016-marathi-movie

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!