कोल्हापूर : औषध निर्मितीच्या क्षेत्रात लागणारा पैसा व कालावधी कमी करण्याचे मोठे आव्हान संशोधकांसमोर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
आंतरविद्याशाखीय संशोधनाची सर्व शाखांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ‘रिसर्च कॉलोक्वियम’चे आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या ‘ड्रग डिस्कव्हरी’ या विषयावरील व्याख्यानाने उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सुमारे दीड तासांहून अधिक काळ आपल्या संशोधनाचे क्षेत्र असलेल्या औषध निर्माण शास्त्राच्या अनुषंगाने संशोधनाचे महत्त्व त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मानवी जीवनातील औषधांचे, त्याच्या शास्त्राचे आणि त्याविषयीच्या संशोधनाचे महत्त्वही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले
Leave a Reply