कोल्हापूर: सदाशिवराव मंडलिक इरिगेशन,अग्रीकल्चर एज्युकेशनल एण्ड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन सदाशिव नगर यांच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला आहे.यावर्षीपासून कायमस्वरूपी विविध क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जाणार असून सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.यंदाचा हा पुरस्कार देशपातळीवर केलेल्या कार्याची दाखल घेऊन लोकहितासाठी सतत झटणाऱ्या पोपटराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.ज्यांनी सरपंच असताना १९९० पासून दुष्काळग्रस्त गावाचा कायापालट करत हिवरेबाजार हे गाव विकासाच्या दृष्टीने एक मॉडेल म्हणून ठेवले.या पोपटराव पवार यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1 लाख रुपये रोख देऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच आमदार गणपतराव देशमुख,कृषिरत्न डॉ.बुधाजीराव मुळीक,उद्योजक परशुराम जाधव,पद्मश्री जी.डी.यादव,क्रीडापटू बिभीषण पाटील,जीवरक्षक दिनकरराव कांबळे अशा मान्यवरांना रोख २५ हजार आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती एस.डी.एम.फौंडेशनचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.येत्या शुक्रवारी ७ आक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजता सदाशिव नगर हमिदवाडा येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शुभ हस्ते बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार संभाजीराजे छत्रपती तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पत्रकार परिषदेला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा.जे.एफ.पाटील,डॉ.राजन गवस,व्ही,बी.पाटील,इंद्रजीत देशमुख,सुर्यकांत बुधीहाळकर,डॉ.जयंत कळके,डॉ.अर्जुन कुंभार,यशवंत भालकर,एम.एस.खापरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply