कोल्हापूर :आरळे (ता. करवीर) येथे आजोबानेच आपल्या नातीवर विळ्याने हल्ला केल्याने नातीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी १० वाजता राहत्या घराच्या दारातच घडली आहे. मीनाक्षी मधूकर कांबळे (वय १९) असे दुर्देवी मुलीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आरळे येथे मीनाक्षी आज सकाळी दहाच्या सुमारास दारात बसली होती. तेव्हा तिचे आजोबा यशवंत धोंडी कांबळे (वय ७०) यांनी मीनाक्षीच्या मानेवर विळ्याने एक वार केला. यानंतर मीनाक्षीचे वडिल मधुकर कांबळे आणि ग्रामस्थांनी तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळी पोलिस रवाना झाले आहेत.
Leave a Reply