
कोल्हापूर: आज केएमटी च्या संपामुळे आज कोल्हापूर करांचे आज हाल झाले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.सहावा वेतन आयोग लागू करावा, पगार नियमीत कलावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचारी संघटना आणि आयुक्तांमधील बैठकीत कुठलाच तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.या संपात 1 हजार कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत. ऐन परीक्षेच्या काळात केएमटी सेवा बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.तसेच परिवहन चे लाखों रूपयांचे नुकसान झाले.
Leave a Reply