
इचलकरंजी:येथील विकली मार्केट यार्डमधील सोनाराचा डोक्यामध्ये हातोडी घालून खून करण्यात आल्याची घटना आज (रविवार) दुपारी ३ वाजता घडली. अनिल चंद्रकांत शिंदे (वय, ३१. रा. हेरवाड, ता. शिरोळ, सध्या, रा. पंथ माळ, इचलकरंजी) असे खून झालेल्या सोनाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे यांचे विकली मार्केटमध्ये परम गोल्ड टेस्टींग नावाचे साने गाळप करण्याचे आणि रिफायनरीचे ज्वेलर्स आहे. आज (रविवार) दुपारी ३ वाजता काही दुकानदार सोने आणण्यासाठी शिंदे याच्या दुकानात गेले असता त्यांना शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसला. या दुकानदारांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस, गावभाग पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी पोलीस व शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेतली.
शिंदे यांच्या डोक्यात हातोडी घालून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. खूनाचे कारण अद्याप समजले नाही
Leave a Reply