कॉंग्रेसला हाराविण्यासाठी कोणतीही निती; चंद्रकांतदादा पाटील

 

कोल्हापूर : कॉंग्रेसला हाराविण्यासाठी कोणतीही निति अवलंबायला आम्ही तयार आहोत,कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नऊही नगरपालिकांच्या निवडणुका भाजप स्वबळावर किंवा जिथे आघाडी करता येईल तिथे आघाडी आणि युती करुन लढेल अशी घोषणा पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.त्या आधी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात जिल्ह्यातील 20 मान्यवरांनी भाजप मधे प्रवेश केला. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, पन्हाळा, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कागल, मुरगूड, मलकापूर, पेठवडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकात भाजप स्वबळावर लढेल. तसेच नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, शिवाय गरज पडली तर नगराध्यक्ष पुरस्कृत असेल असे ते म्हणाले. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष घटक पक्ष म्हणून आमच्या सोबत येत आहे.जुन्या पक्ष श्रेष्ठीना आम्ही नाराज करणार नाही. आणि नविन लोकांना त्यांच्या कार्यकर्तुत्वाप्रमाणे पद आणि जबाबदारी दिली जाईल असेही चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले.यावेळी आमदार अमल महाडिक, आम. सुरेश हळवणकर, समरजीत घाटगे,जिल्हाध्यक्ष संदीप देसाई,महेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते ऊपस्थित होते.
या घोषणेमुळे याकडे सर्वांचे लक्ष निवडणुकीकड़े लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!