
दिल्ली:काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा रद्दबातल करण्यात येतील.
10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे
रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील 72 तास म्हणजे 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. देशभरात 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम मशिन्स बंद राहणार आहेत.
Leave a Reply