नात्यांना मोकळा श्वासमिळवून देणारा व्हेंटिलेटर’ला सर्वत्र हाऊसफुल प्रतिसाद

 

ventilator-ashufमुंबई:चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरीअनेकदा हे माध्यम आपल्याला आरसादाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यातबघुन आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं..कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो.. कधीहरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती.. दूरगेलेल्या नात्यांना आणि एकाच कुटुंबात राहूनहीदुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचं किंवा त्यांनाआरसा दाखवण्याचं काम सध्याएक मराठी चित्रपट करतोय आणि त्याच्या याचकामाचं कौतुक समाजमाध्यमं आणि प्रेक्षकांच्याचर्चेतून ऐकायला मिळतंय.. हा चित्रपट म्हणजेनुकताच प्रदर्शित झालेला व्हेंटिलेटर.. एकचित्रपट काय करु शकतो याची प्रचिती सध्याव्हेंटिलेटरच्या निमित्ताने बघायला मिळत आहे.असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक राजेशमापुसकर आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांनाडोंबिवलीतील टिळक चित्रपटगृहात आला.दिग्दर्शक राजेश मापुसकर , पात्र संयोजक रोहनमापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषणतेलंग, आशा ज्ञाते यांनी काल डोंबिवलीतीलटिळक व मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबरचित्रपट पाहिला.

 

संपूर्ण महाराष्ट्रात  व्हेंटिलेटरला हाऊसफुलप्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे हा चित्रपटबघण्यासाठी प्रेक्षक सहकुटुंब येत आहेत. याठिकाणी एक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देतानाम्हणाले की, “आपलं कुटुंब मोठं असलं तरीआपण फक्त कुटुंबातील कुणाच्या लग्नासाठी,कुणाचं निधन झाल्यानंतर आणि संपत्तीच्यावाटणीसाठीच तेवढे एकत्र येतो.. त्या येण्यातहीभावनिक ओलावा किती असतो हा वेगळा मुद्दा..आणि अशाच आपल्या रुक्ष बनत चाललेल्यामानसिकतेचं रुप दाखवण्याचं काम हा चित्रपटकरतोय.. मी हा चित्रपट पुन्हा एकदा बघतोय..यात हरवलेला ‘मी’ शोधतोय. माझ्या पुढच्यापिढीसोबत हे होऊ नये म्हणून आता मी माझ्याछोट्या मुलीला दर रविवारी आपल्या एकानातेवाईकाकडे घेऊन जाण्याचा निश्चय केलाआहे.”

यावेळी जितेंद्र जोशी म्हणाले की, “प्रेक्षकांच्या याअशा अनेक भारावून टाकणा-या प्रतिक्रिया मलामिळत आहेत. कालच एका मुलीने सांगितलं कीमाझं माझ्या आईशी आजवर कधीच पटलं नाही,परंतु हा चित्रपट बघुन मी ठरवलंय की इथुन पुढेआईचं सगळं ऐकायचं कारण आपले पालककायम आपल्या चांगल्याचाच विचार करतात.”प्रेक्षकांच्या या प्रतिसादाने दिग्दर्शक राजेशमापुसकरसुद्धा हळवे झाले होते. ते म्हणाले की, “प्रत्येकच कुटुंबात काही ना काही समस्या असूशकतात. दोन पिढ्या एकत्र आल्या की हेघडणारच पण आपण त्याचीच काळजी घ्यायलाहवी. कोणतंही नातं हे संवादानेच टिकून राहतंत्यामुळे सतत संवाद साधला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!