जगातील उपलब्ध जैवविविधतेतील मोठा हिस्सा भारतीय उपखंडामध्ये:प्र-कुलगुरु डॉ.जी.आर.नाईक

 

dsc_8090कोल्हापूर – जगातील उपलब्ध जैवविविधतेतील मोठा हिस्सा हा भारतीय उपखंडामध्ये आढळतो. तथापि, यातील अनेक वनस्पतींचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही, असे प्रतिपादन गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.जी.आर.नाईक यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागामार्फत ‘जैवविविधतेचे संवर्धन व त्याची शाश्वत उपयुक्तता’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी डॉ.नाईक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे होते.

या परिषदेमध्ये स्लोव्हाक रिपब्लीक, हौंगकौंग, श्रीलंका तसेच देश विदेशातील सुमारे 400 संशोधक सहभागी झालेले आहेत.

प्र-कुलगुरु डॉ.जी.आर.नाईक पुढे म्हणाले, सध्याच्या काळामधील जैवविविधतेच्या अनन्य साधारण महत्वामुळे वनस्पती वर्गीकरण शास्त्राची उपयुक्तता आधोरिकीत झालेली आहे. या पार्श्वभूमीवर वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील संशोधकांची जबाबदारी निश्चितच मोठी आहे. भारतीय मूळ असणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त वनस्पती हया दैनंदिन आहाराची गरज भागवतात. हरितवायु उत्सर्जन व इंधनाचा वारेमाप वापर होत असल्यामुळे उपजावू जमीनींचे वाळवंटीकरण होत आहे. येवू घातलेल्या जीएमओ पीकांमुळे होणाऱ्या फायद्यांच्याबरोबरच जैवविविधतेला असणा-या संभाव्य धोक्यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, जैव विविधता ही मानवाची खरी संपत्ती आहे. यामधूनच अन्न, वस्त्रांबरोबरच आजच्या काळात आवश्यक असणा-या औषधांचा स्त्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. दुर्मिळ होत चालेल्या वनस्पतींचे संगोपन व संवर्धन करण्याबरोबर यासंदर्भात समाजजागृती करणेही आवश्यक आहे. संशोधकांनी वनस्पती वर्गीकरणशास्त्र अभ्यासणे आवश्यकता आहे. यामधून अगणित अशी रोजगार निर्मिती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!