
कोल्हापूर: मलकापूर येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक सामाजिक संस्था अंतर्गत आधार गतिमंद व अस्थिव्यंग मुलांसाठीचे विद्यालय चालवण्यात येत होते. परंतु शासनाकडून मिळणार्या अनुदानाचा गैरवापर करुन या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा, भोजन इत्यादी प्राथमिक बाबीही पुरवण्यात येत नव्हत्या त्यामुळे या विद्यालयातील विद्यार्थी कुपोषणाचे बळी ठरले.
आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकार्यांनी सी.पी.आर.ला भेट दिली. याप्रसंगी सी.पी.आर.चे अधिष्ठाता डॉ.रामानंद हेही उपस्थित होते. याप्रसंगी या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी व माहिती संबंधीत डॉक्टरांकडून घेण्यात आली. या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणार्या प्रकारबद्द्ल तीव्र भावना व्यक्त झाल्या. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी या सर्व विद्यार्थ्यांवर जे उपचार सुरु आहेत ते अत्यंत चांगल्या पद्दतीने होत असल्यामुळे सी.पी.आर. प्रशासनाचे आभार मानले. जिल्हाचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आवश्यकत्या सर्व व्यवस्था पुरवण्यात येतील असे सांगीतले. तसेच या विद्यार्थ्यांची अवस्था ज्याने अत्यंत केवीलवाणी केली आहे त्या संस्थाचालकाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या संदर्भातले निवेदन पोलीस प्रमुखांना देणार आहे असेही सांगीतले.माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी भविष्यात या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही गरजांसाठी भाजपा कोल्हापूर महानगर सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुभाष रामुगडे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, दिलीप मेत्राणी, अॅड.संपतराव पवार, श्रीकांत घुंटे, अनील काटकर, विवेक कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली.
Leave a Reply