
कोल्हापूर: येथील ‘श्रमिक प्रतिष्ठान’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे ?’ या पुस्तकात कॉ. पानसरे यांचा येथील पथकर प्रकरणीच्या नेतृत्त्वाचा उल्लेख आहे. या पुस्तकात पथकर प्रश्नी राजकीय नेते, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी पैसे घेतल्याविषयी धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. पोलिसांची अन्वेषणाची दिशा भरकटलेली आहे. कॉ. पानसरे प्रकरणातील योग्य मारेकर्यांपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी या दिशेने अन्वेषण करावे, अशी मागणी सर्वश्री बाबासाहेब भोपळे, मधुकर नाझरे आणि शिवानंद स्वामी पत्रकार परिषदेत केली.
सतीश शेट्टी आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात साम्य पोलिसांनी पडताळावे
कोल्हापूर येथील पथकर प्रश्नात ज्या ‘आयआरबी’ आस्थापनाचा उल्लेख होता, त्या आस्थापनातील लोकांवर पुणे येथील सतीश शेट्टी खून प्रकरणी संशय व्यक्त केला जात होता. सकाळी ‘मॉर्निंग वॉक’वेळी सतीश शेट्टी आणि कॉ. पानसरे यांचा खून करण्यात आला होता, हे या दोन्ही खून प्रकरणांतील साम्य आहे. त्या खून प्रकरणातील गुन्हेगार अजूनही मिळालेले नाहीत. मृत झालेले हे दोघेही ‘आयआर्बी आस्थापना’च्या विरोधात होते. पुणे येथे सतीश शेट्टी प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे खोटे होते. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने अन्वेषण करायला हवे, अशी मागणी शिवानंद स्वामी यांनी केली. ‘कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे’, हे पुस्तक कॉ. पानसरे यांच्या ‘श्रमिक प्रतिष्ठान’ने प्रकाशित केले. मधुकर नाझरे म्हणाले ‘कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे ?’ हे पुस्तके लिहिणारे विश्वास पाटील हे पुस्तक लिहिते वेळी वरिष्ठ बातमीदार होते आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर विश्वस्त असणार्या पुणे येथील साधना ट्रस्टद्वारे त्यांना फेलोशिपही देण्यात आली होती. सदर पुस्तकाला कॉ. गोविंद पानसरे यांची प्रस्तावना असून हे त्यांच्याच ‘श्रमिक प्रतिष्ठान’ने प्रकाशित केलेले आहे. लेखकाच्या प्रस्तावनेतून हे स्पष्ट होते की, कॉ. पानसरे यांच्या पाठपुराव्यामुळे पुस्तक पूर्ण होऊ शकले. संपूर्ण पुस्तकात कॉ. पानसरे यांच्या पथकर प्रकरणीच्या नेतृत्वाचा उल्लेख आहे. याची प्रथमावृत्ती फेब्रुवारी २०१२ मध्ये निघालेली आहे आणि छपाई भारती मुद्रणालय, शाहूपुरी चौथी गल्ली, कोल्हापूर येथे झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी याही दिशेने अन्वेषण करायला हवे, अशी त्यांनी मागणी केली. बाबासाहेब भोपळे म्हणाले कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणी पोलिसांनी आपल्याकडे पुरावे आहेत, असे सांगून तशी माहिती प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केली आहे. आम्ही कॉ. पानसरे प्रकरणी सनातनचा साधक आणि संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा खटला चालवण्याची मागणी केल्यावर पोलीस ही मागणी अमान्य करतात. कॉ. पानसरे यांचे वैचारिक पूर्ववैमनस्य सनातन संस्था अथवा हिंदुत्ववादी यांच्याशी होते, या दिशेेने पोलिसांचे अन्वेषण चालू आहे, दोन जणांना अटकही झालेली असली, तरी खूनी सापडलेले नाहीत. गोळी झाडलेले शस्त्र, वापरली गेलेली गाडी या गोष्टी पोलिसांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अन्वेषणात काही रहाते आहे काय ? अन्वेषणाची दिशा चुकते आहे काय ? असे प्रश्न समाजात अनेकांना पडत आहेत. यासाठी पोलिसांनी पानसरे यांचे निकाल, आंदोलने, यांच्या श्रमिक प्रतिष्ठानच्या कृती यांचा अभ्यास करून अन्वेषण करावे, अशी मागणी बाबासाहेब भोपळे यांनी केली. ‘कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे’ या पुस्तकातील केलेल्या आरोपांचे एस्आयटीने अन्वेषण करावे असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.
‘कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे ?’ हे पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला बर्याच गोष्टींचा उलघडा झाला. यामध्ये केलेल्या आरोपांमध्ये आम्हाला तथ्य वाटत आहे. सतीश शेट्टी यांचा खून रस्ते, बांधकाम, पथकर या प्रश्नावरूनच झाला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी काही जणांना अटक करून आरोपपत्र प्रविष्ट केले.
नंतर सीबीआयने आपल्या अन्वेषणात पुणे पोलिसांनी चुकीचे अन्वेषण करून काही जणांना अटक केल्याचा ठपका ठेवला. नंतर सीबीआयने ज्यांनी अन्वेषण केले, त्यांनाच नंतर आरोपी केले !
कॉ. पानसरे यांच्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत, त्यांनीच हा खून केला आहे का ? याचे अन्वेषण पोलिसांनीच करायला हवे. प्रत्यक्षात पोलिसांनी तसे काहीही केले नाही. पोलिसांना भीती का वाटते, ते का माहिती देत नाहीत ? . गुन्हा करणारा गुन्हेगार हा ‘मी गुन्हा करणार आहे’, असे इतरांना कधीच सांगत नसतो, तर तो थंड डोक्याने गुन्हा करत असतो. त्याला मारायचे आहे, शत्रूत्व आहे, हे तो जाहीर करत नाही, उलट मैत्रीचा आव आणतो. ही सर्वसामान्य गुन्हा पद्धत पोलीस का विचारात घेत नाहीत ? सनातन संस्थेचे पानसरे यांचे पूर्ववैमन्य होते, सनातन संस्थेने पानसरे यांच्या विरोधात न्यायालयीन याचिका प्रविष्ट केल्या होत्या. म्हणून सनातनकडे संशयाची सुई वळत असेल, तर पानसरे यांच्या आंदोलनामुळे अथवा या पुस्तकामुळे त्यांचे आर्थिक हानी झाली आहे अथवा ज्यांची अपकिर्ती झाली, त्याचे अन्वेषण करायला नको का कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे ?’ या पुस्तकात अत्यंत धक्कादायक आरोप, खुलासे, माहिती वाचायला मिळते. ‘कोल्हापूर येथे खासगीकरणातून रस्ते प्रकल्प होताना जो अपव्यवहार झाला, तो कोणत्याही सुजाण नागरिकाला चीड आणणाराच होता, या प्रकल्पाच्या मान्यतेचा पायाच भ्रष्टाचार आहे. त्यामुळे अगदी प्रथमपासूनच आस्थापन त्यासाठी पैसे वाटत आली आहे. या प्रकल्पाचा मूळ ठराव महापालिकेत २००७ मध्ये संमत झाला. खासगीकरणातून हा प्रकल्प व्हावा म्हणून महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव व्हावा लागतो, हा ठराव नगरसेवकांनी संमत करून द्यावा, यासाठी महापालिकेच्या राजकारणामध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे, अशा प्रमुख चार राजकीय नेत्यांना त्यावेळी संबंधित कंपनीने प्रत्येकी ५ कोटी रुपये दिल्याची चर्चा होती. तशा वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. नेत्यांना एवढी रक्कम दिल्यावर नगरसेवक नाराज झाले म्हणून त्यांनाही प्रत्येकी १ लाख रुपये दिल्याची चर्चा होती. ही रक्कम तात्कालिन सभागृहातील सगळ्याच सदस्यांनी घेतली असे म्हणता येत नाही, कारण काही जणांनी या भ्रष्ट्राचारास कडाडून विरोध केला होता; परंतु त्यांचा आवाज क्षीण होता.
संबंधित आस्थापनाने रक्कम केवळ राजकीय नेते आणि सदस्य यांनाच दिली असे नाही, तर त्यामध्ये महापालिकेतील अनेक अधिकार्यांनीही हात धुवून घेतले. तेव्हाही संबंधित आस्थापनाने एका प्रख्यात उपाहारगृहामध्ये नगरसेवकांना बोलावून प्रत्येकी ५० सहस्र रुपयांची पाकीटे वाटली, ती पाकीटे घेण्यासाठी अनेकांच्या उड्या पडल्या. थेट उपाहारगृहामध्ये बोलवून लाच दिली जाणे म्हणजे संबंधित आस्थापनाचे धाडसही किती असू शकते ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे.’
१ जुलै २०१० रस्ते प्रकल्पाची सीआयडी चौकशी करण्याची महापालिका अधिकार्यांची मागणी. या प्रकल्पात काही नेत्यांनी २० कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा आमदार महादेवराव महाडिक यांचा आरोप’
वर या पुस्तकातील काही अवतरणे दिलेली असली तरी सर्वच पुस्तकाचा मुळातून अभ्यास करणे आवश्यक आहे. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली पथकरनाक्याविषयी असे आरोप केले गेल्यामुळे दुखावलेल्या लोकांनी/ज्यांचे हितसंबंध दुखावले अशा लोकांनी खून केला नसेल कशावरून ? ही शक्यता पडताळायला नको काय ते वैमनस्याचे कारण आहे, असे पोलिसांचे त्यातील म्हणणे आहे. या तक्रारी करणे हा खरेतर सांविधानिक हक्क आहे.
पानसरे खून प्रकरणातील खूनी पकडले जावेत म्हणून हे पुस्तक आपणांस देत आहोत. पुस्तकात ज्यांच्यावर आरोप केले आहेत, ते पडताळायचे काम आपले आहे, आमचे नाही, आम्हाला ते शक्यही नाही, त्यामुळे ते पुस्तक खरे आहे अथवा खोटे हे आम्ही सांगू शकत नाही. संबंधितांवर यातून नाहक चिखलफेक करायचा आमचा उद्देशही नाही, अन्वेषणात साहाय्य व्हावे.
Leave a Reply