
कोल्हापूर : केंद्र सरकारने 500 आणि एक हजाराची नोट रद्द केल्या. मात्र, शासन आदेशाने महापालिकेने या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार व शनिवार आणि आज या तीन दिवसांत महापालिकेकडे विविध करांतून तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, तर शनिवारी सुट्टीच्या दिवशी 52 लाख 60 हजार 196 रुपये जमा झाले आहेत. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा फायदा घेऊन महापालिका प्रशासनाने थकीत आणि चालू कर वसुलीसाठी या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा नागरिकांना घेतला असून शुक्रवारी 2 कोटी 89 लाख 57 हजार 538 रुपये, तर शनिवारी 52 लाख 60 हजार 196 रुपये जमा झाले.
महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी सोमवारपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत महापालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुरू आहेत. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. घरफाळा, परवाना फी, इस्टेट भाडे, होर्डिग्ज जाहीरात कर, पाणी बिल यांची रक्कम या नोटा स्वीकारून भरून घेतली जाणार आहे. शहरातील नागरिकांनी आपले थकीत कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply