कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची आसाममधल्या बाजारपेठेला भेट

 
मुंबई:आसाम दौऱ्यावर गेलेल्या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आसाममधील “पामोही फळे आणि भाजीपाला होलसेल मार्केट” भेट दिली. या मार्केटमधील फळे आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव जाणून घेतले. महाराष्ट्रातील भाजीपाला, कांदा, डाळींब, द्राक्षे अशा प्रकारचा शेतीमाल आसाममधल्या मार्केटमध्ये कसा आणता येईल, याबाबत चर्चा सविस्त चर्चा करण्यात आली. या बैठकीला मार्केट कमिटीचे सचिव पुलीन मुडीयार, आसामचे पणन अधिकारी व तेथील  व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यानंतर सदाभाऊंनी आपला मोर्चा स्थानिक शेतकऱ्यांकडे वळवला. दरंग जिल्हातील बेहुदिया या गावातील शेतकरी हबीबुर रेहमाण यांच्या शेतावरचं नामदार सदाभाऊ खोत यांनी बैठक भरवली. त्यांच्या शेतातील कोबी, मिरची, घेवडा, भोपळा, भात इ. पिकांची पाहणी करुन उत्पादन, समस्या, अडचणि याबाबतच्या समस्यांची माहिती घेतली. आशादुल्ला या युवक शेतकऱ्यानं शेतीसाठी कर्ज घेताना अडचणी येत असल्याचं सांगितलं. याबाबत आपण आसामimg-20161113-wa0523च्या कृषीमंत्र्यांना लेखी पत्र लिहून आवश्यक ती कारवाई करण्याबाबत कळवणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत  यांनी सांगितल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!