
मुंबई:५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा करण्यातआली. १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान नोटा बँकांतून बदलूनघेण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, बाजारपेठेत विचित्रपरिस्थिती आहे. तळागाळातल्या घटकांपर्यंत या बदलाची माहितीनीटपणे पोहोचलेली नाही. नोटा रद्द झाल्या म्हणजे नेमकं कायझालं, नोटा बदलायच्या म्हणजे काय करायचं इथपासून तेबदल्यात किती रक्कम मिळणार याची अनेकांना माहिती नाही. हेलक्षात घेऊन ‘स्टार प्रवाह’च्या नकुशी आणि गोठ या मालिकेतीलनकुशी साकारणारी प्रसिद्धी आयलवार आणि राधा साकारणारीरुपल नंद यांनी मुंबईतील काही भाजी विक्रेत्यांना मार्गदर्शन केलं.त्यांनी झालेल्या बदलाची माहिती भाजी विक्रेत्यांना दिली. नोटाबदलण्यासाठी कोणाच्याही प्रलोभनांना फसू नका, बँकेत किंवापोस्टात जाऊनच नोटा बदलून घ्या, तुम्ही दिलेल्या रकमेएवढीचरक्कम मिळणार आहे, यात कोणतीही योजना नाही अशी माहितीदेण्यात आली. भाजी विक्रेत्यांनीही या दोघींचं म्हणणं नीटसमजून घेतलं आणि त्यांनी पुढाकार घेऊन माहिती दिल्याबद्दलआभार मानले. राधा आणि नकुशीच्या यांच्या या कृतीतून त्यांचंसामाजिक भान दिसून आलं.
Leave a Reply