
कोल्हापूर :नरेंद्र मोदींबाबत अश्लील भाषेत बोलणाऱ्यांवर करवाईची बजरंग दलाची मागणी आज करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 500 रु नोट बंदीबाबत मोदीजींना आणि हिंदुस्थानी नागरीकांबाबत अश्लील वक्तव्य ,तसेच शिवीगाळ करणाऱ्या व्हिडियोतील व्यक्तीविरोधात आणि समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते अमरसिंह यांच्या विरोधात आज सायंकाळी 6 वा , जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दल जिल्हाप्रमुख बंडा साळुंखे आणि शहरप्रमुख महेश उरसाल यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे .पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी योग्य करवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवाजी ससे ,राजेंद्र सूर्यवंशी ,सुनील पाटील ,अवधूत भाट्ये,सुधीर सूर्यवंशी,आकाश नवरूखे उपस्थित होते.
Leave a Reply