
कोल्हापूर: मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोल्हापुरात मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे येत्या १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन सासने मैदान येथे करण्यात आले असून या प्रदर्शनात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे १०० स्टॉल्स असणार आहेत.तसेच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर कर्नाटक,गोवा,आणि कोकण येथील १५ हजाराहून अधिक उद्योजक भेट देतील.आणि याचा फायदा कोल्हापूर,सांगली,सातारा,बेळगाव आणि कोकण याठीकाणच्या उद्योग तसेच उद्योजकांना मिळणार आहे.अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन १९ तारखेला सकाळी साडे आकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी,महापालिका आयुक्त पी.शिवशंकर,खा.संभाजीराजे छत्रपती,खा.धनंजय महाडिक,आ.सतेज पाटील,आ.सुजित मिणचेकर,आ.राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून खासदार पदी निवड झाल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचा विशेष सत्कार होणार आहे असेही शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन ऑफ कोल्हापूरचे सुरेश जैन यांनी सांगितले .मंदीच्या काळातही कोल्हापूरचे उद्योगक्षेत्र सुरक्षित आहे.चिंता करण्याची गरज नाही.नवनवीन येऊ घातलेल्या उद्योगांना मार्गदर्शन तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे गरजेचे आहे.यासाठी औद्योगिक प्रदर्शनामध्ये विविध नामांकित फौंड्री इक़्विपमेंट,मायक्रोटेक,लक्ष्मी सेल्स आणि सर्विस,प्रिसिजन मशीन क्राफ्ट,हिंडोल्को,जॉन्सन इंजिनीअर्स,किर्लोस्कर आॅईल्स सारख्या अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत.दुपारी 1 ते 3 या वेळेत इंजिनिअरिंग कॉलेज विद्यर्थ्याना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.प्रदर्शनात पॅकेजिंग,सोलर,वेव्हिंग मशीन,स्टोअरेज सिस्टीम,कटिंग टूल्स,मटेरीयल हॅड्लिंग यासारखी विविध उत्पादने प्रात्यक्षिकासह पाहायला मिळणार आहे.तरी उद्योग क्षेत्राची संपूर्ण माहित घेण्याकरिता तसेच उद्योजक होऊ पाहणाऱ्या सर्वांसाठीच हे प्रदर्शन उपयुक्त आहे.स्मॅक,गोशिमा,उद्यम सोसायटी,चेंबर ऑफ कॉमर्स,इंजिनीअरिंग असोसिएशन,एमआयडीसी,आयआयएफ, एम.एस.एम.ई तसेच ऑनलाईन पार्टनर टेंडर टायगर यांनी एकत्र येऊन भरविले असून या प्रदर्शनाचे संपूर्ण व्यवस्थापन क्रिएटिव्हज एक्झीबिशन आणि इव्हेंट या संस्थेने केले आहे.पत्रकार परिषदेस संयोजक उपाध्यक्ष संजय शेटे,हिंदुराव कामते,ललित गांधी,संजय अंगडी,सुजित चव्हाण उपस्थित होते.
Leave a Reply