अन्यायी इन्शुरन्स कपन्यांमुळे वाहनधारकांचे नुकसान;याविरोधात मनसे लढा उभारणार

 

कोल्हापूर:रिक्षा,मालवाहतूक,डंपर आणि ट्रक सारख्या असंख्य वाहनधारकांची या इन्शुरन्स कंपन्यांनी अक्षरशः लुट चालविली आहे.दरवर्षी इन्शुरन्स रकमेत 2 हजार रुपयांची होणारी वाढ,त्याशिवाय आरटीओकडून वाहन पासिंग होत नाही.या कंपन्या इन्शुरन्स गोळा करतात आणि अपघात झाला तरी याचा उपयोग त्या वाहनधारकाला काडीमात्र होत नाही.असे असतानाही वाहतूक प्रशासन झोपले आहे.आज शेतकऱ्यांपेक्षाही वाईट अवस्था वाहनधारकांची झाली आहे.अशा लुटारू इन्शुरन्स कंपन्यांनी ही लुट थांबवावी,वाहनधारकाच्या मानगुटीवरील दरवर्षी होणारी 2 हजार रुपयांची वाढ थांबवावी अन्यथा तीव्र लढा उभारू असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.याचा पहिला टप्पा म्हणून प्रथम महामार्ग रोको,नंतर रेल्वे रोको आणि त्यानंतर कोल्हापूर बंदची हाक देण्यात आहे.असेही राजू जाधव यांनी निक्षून सांगितले.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या.यात शहर उपध्याक्षपदी नरेंद्र कवाळे,करवीर तालुका अध्यक्ष दक्षिण तानाजी मोरे,प्रसिद्धी प्रमुख राज मकानदार यांच्यासह नेर्ली तामगाव,वारणा कोडोली,पन्हाळा,माले.गोकुळ शिरगाव येथील सर्व पदांच्या निवडीचे प्रमाणपत्र पदाधिकारी यांना देण्यात आले.पत्रकार परिषदेस राज मकानदार,राजू बागवान,तानाजी मोरे,सुकुमार सोहनी,अमोल पाटील,शिवाजी मगदूम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!