शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नांदवडेकर

 

कोल्हापूर:शिवाजी dr-vilas-nandavadekarविद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास दत्तू नांदवडेकर यांची कुलसचिव निवड समितीने निवड केली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे दिली.

डॉ. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या मुलाखतीसाठी एकूण १७ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी तेरा उमेदवार आज मुलाखतीसाठी उपस्थित होते. कुलसचिव निवड समितीने आज दिवसभरात त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलसचिव म्हणून डॉ. विलास दत्तू नांदवडेकर यांची निवड करण्यात आली.

डॉ. नांदवडेकर हे पुण्याच्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. याच संस्थेत त्यांनी १९९८पासून अधिव्याख्याता व प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. डॉ. नांदवडेकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील असून गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!