
कोल्हापूर : द ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर असो. द्वारा आयोजित प्लॅस्टीव्हीजन इंडिया २०१७ हे एकझीबीशन मुंबई येथे १९ ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबई एकझीबिशन सेंटर या ठिकाणी भरवण्यात येणार आहे. हे दहावे प्लॅस्टीक एकझीबीशन जगातील ५ व्या स्थानावर गणले आहे अशी माहिती द ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर असो. चे चेअरमन अरुण कुंभोजकर व पॉलिमर ग्रुपचे सत्यजित भोंसले यांनी सांगितले.
४५ हून अधिक देशातील कंपन्या या ५ दिवस चालणाऱ्या एकझीबीशनमध्ये भाग घेणार असून १५०० हून अधिक स्टॉल विविध सेग्मेंट मधील वेगवेगळ्या इंडस्ट्रीज येथे त्यांचे स्टॉल असणार असून ९० हजार स्के. मी मधील मंच प्रदर्शन आहे. यामध्ये नवनवीन तंत्र आणि यंत्र याची ओळख सहज होणार आहे. विविध तांत्रिक चर्चासत्र या कालावधीत आयोजित केली आहे. नवीन टेक्नोलॉजी व ट्रेंड समोर येणार आहे. यामध्ये अॅग्रीकल्चर, सोलर अॅटोमेशन, डाय व मोल्ड, आणि वेस्ट मॅनेजमेंट वर आधारित सहा स्वतंत्र विभाग असेल. ५० हून अधिक रोड शो द्वारे प्रमोशन कॅम्पेन भारतात होणार असून २ लाखाहून अधिक व्हिजिटरस आहेत. येणाऱ्या व्हिजीटरसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे.
Leave a Reply