
कोल्हापूर: मेक इन इंडियाच्या धर्तीवर कोल्हापुरात मेक इन कोल्हापूर इंडस्ट्रीया २०१६ प्रदर्शनाचे येत्या १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन सासने मैदान येथे करण्यात आले आहे.कोल्हापूरसारख्या औद्योगिक क्षेत्रात प्रगत अशा जिल्हाचे नाव सर्व जगात पोहचवायचे असेल तर मार्केटिंग करणे ही गरज बनली आहे कारण सध्या मार्केटिंग हेच जगाचे सूत्र बनले आहे असे प्रतिपादन सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी केले.विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.राजकीय स्पर्धेतून अश्या चांगल्या गोष्टी घडतात.बाहेरचे उद्योग इथे यायला पाहिजेत.आणि कोल्हापूरचे मार्केटिंग होऊन कोल्हापूरचे नाव जगात पोहचले पाहिजे असेही आमदार पाटील म्हणाले. या प्रदर्शनात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे १०० स्टॉल्स आहेत.तसेच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर कर्नाटक,गोवा,आणि कोकण येथील १५ हजाराहून अधिक उद्योजक भेट देतील.आणि याचा फायदा कोल्हापूर,सांगली,सातारा,बेळगाव आणि कोकण याठीकाणच्या उद्योग तसेच उद्योजकांना मिळणार आहे.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी आपल्या भाषणात नमूद केले.कोल्हापूरची जागा निश्चित करून याचा कॉरिडॉरमध्ये समावेश होण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.3 वर्षापूवी सुरु झालेल्या या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे असे स्मॅकचे सुरेश जैन यांनी सांगितले.
मंदीच्या काळातही कोल्हापूरचे उद्योगक्षेत्र सुरक्षित आहे.चिंता करण्याची गरज नाही.नवनवीन येऊ घातलेल्या उद्योगांना मार्गदर्शन तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे गरजेचे आहे.यासाठी औद्योगिक प्रदर्शनामध्ये विविध नामांकित फौंड्री इक़्विपमेंट,मायक्रोटेक,लक्ष्मी सेल्स आणि सर्विस,प्रिसिजन मशीन क्राफ्ट,हिंडोल्को,जॉन्सन इंजिनीअर्स,किर्लोस्कर आॅईल्स सारख्या अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत.असे संजय जोशी म्हणाले.औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतीनिधिनी पुढाकार घ्यावा असे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले.मटेरियल हंँड्लिंग नीट न केल्याने १५ टक्के उद्योगात उद्योजकांना नुकसान होते हे थांबले पाहिजे असे गोदरेज सेल्स आणि मार्केटींगचे उपाध्यक्ष कावस धुमासिया म्हणाले.दरवर्षी ५० हजार कोटी वाचविण्यासाठी मटेरियल हंड्लिंग यावर उद्योजकांनी फोकस करणे गरजेचे आहे असे रिलायंस पॉलीमारचे सत्यजित भोसले म्हणाले.संजय शेटे यांनी आभार मानले.
दुपारी 1 ते 3 या वेळेत इंजिनिअरिंग कॉलेज विद्यर्थ्याना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.प्रदर्शनात पॅकेजिंग,सोलर,वेव्हिंग मशीन,स्टोअरेज सिस्टीम,कटिंग टूल्स,मटेरीयल हॅड्लिंग यासारखी विविध उत्पादने प्रात्यक्षिकासह पाहायला मिळणार आहे.तरी उद्योग क्षेत्राची संपूर्ण माहित घेण्याकरिता तसेच उद्योजक होऊ पाहणाऱ्या सर्वांसाठीच हे प्रदर्शन उपयुक्त आहे.स्मॅक,गोशिमा,उद्यम सोसायटी,चेंबर ऑफ कॉमर्स,इंजिनीअरिंग असोसिएशन,एमआयडीसी,आयआयएफ, एम.एस.एम.ई तसेच ऑनलाईन पार्टनर टेंडर टायगर यांनी एकत्र येऊन भरविले असून या प्रदर्शनाचे संपूर्ण व्यवस्थापन क्रिएटिव्हज एक्झीबिशन आणि इव्हेंट या संस्थेने केले आहे.कार्यक्रमास सुजित चव्हाण,हिंदुराव कामतेचंद्रकांत जाधव,संजय अंगडीबाबाभाई वसा यांच्यासह उद्योजक आयटी क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.
Leave a Reply