
कोल्हापूर : अगामी ऑलिंपिक्समध्ये अधिकाधिक यश संपादन करण्यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सुरु केलेल्या खेळ क्रांतीचा नारा या पथदर्शी प्रकल्पास गती मिळाली असून जिल्हातील 16 प्रकल्पातील 4 हजार अंगणवाडीतील 2 लाख मुलांना फिजीकल फिटणेस टेस्टचे धडे आंगणवाडी सुपरवायझरच्या माध्यमातून मोफत दिले आहे. या प्रकल्पांतर्गत आंगणवाडी शिक्षिकी तसेच सुपरवायझर्स यांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन असल्याचे करण्यासाठी जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सांगितले. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत शिक्षण आणि खेळाला महत्त्व देणारे PPFNS ( PRE-PRIMARY FITNESS & SPORTS SCHOOL) मॉडेल तयार करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हयात शहर, ग्रामीण व प्रत्येक तालुका मिळून 50 शाळांची श्रृंखला जून 2017 पासुन सुरू करण्याचा विचार आहे. या मॉडल श्रृंखला मध्ये एकाच प्रकारचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. यानुसार वेगळया वातावरणात सर्व मुलानी दोन्ही हातांनी लिहीणे, एक हाताने गणित तर दुस-या हाताने अल्फाबेटीक, देशांची नावे व राजधानी तसेच त्या त्या देशाची मुद्रा या बद्दलची माहीती दिली जात आहे, एकंदरीत LKG व UKG level पर्यंतच मुलांना बोलण्याची कला शिकविण्यावरही भर दिला आहे.
फिटनेसमध्ये मोटर कॉलिटी टेस्टच्या माध्यमातून स्थिर उडी, भिंतीवरची उडी, बॉल फेकने, शरीरातील लवचीकपणा चेक करने. Twist Jump (उडी मारून फिरने), Free Jump (दोन्ही पाय मिळवून जागेवरती उडी मारने), स्टेपअप्स (पायरीवरती चढणे/उतरणे). अशा प्रकारच्या वेगवेगळया 16 टेस्टच्या माध्यमातून मुलाना टेस्ट केले जाईल. यासाठी 100 वेगवेगळया व्यायाम प्रकारातून प्रशिक्षण दिले जाणार आहे, आणि जी मुले लहानपणी फिट व ऍ़क्टीव असतात तिच मुले त्यांचा आवडत्या खेळामध्ये नाविन्य मिळवू शकतात, त्याच बरोबर अशी मुले भविष्यात निवडलेल्या करीअर मध्ये सुध्दा यशस्वी होतील, असा विश्वासही मेजर सुभाश सासने यांनी स्पष्ट केले.
खेळ या क्रीडा शाळेच्या मॉडल मध्ये सर्व 32 बत्तीस ऑलिंपिक्स खेळांची माहीती/ओळख (Information) लहानपणापासूनच मुलांना दिली जाणार आहे व सर्व मुख्य खेळांचे सर्वसाधारण प्रशिक्षण (Major Sports Events चे Basic Skill) शिकविले जाणार आहेत. तसेच जास्तीत जास्त Sports Equipment (खेळाचे उपकरण) हातळण्याची मुलांना संधी (Chance) मिळणार आहे, म्हणजेच UKG पर्यंत मुलाना खूप काही खेळांचे ज्ञान प्राप्त होणार आहे. तसेच Sports ची Injury (दुखापत) ठीक करण्यासाठी Sports Medicine Doctors चा समावेश या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे. PPFNS मॉडेल मधून प्रशिक्षण घेण्या-या मुलांना आपले कौैशल्य पारखण्यासाठी आंतरशालीय (INTER PPFNS Competition) स्पर्धा त्या त्या Age Group wise आयोजित केल्या जातील आहे. त्यामुळे मूलांना लहानपणापासूनच हार व जीत समजणार आहे व स्पर्धे मुळे प्रोत्साहन मिळणार आहे. प्रत्येक PPNFS सेन्टरला खेळाचे बरेच साहित्य लागणार असल्याने Small Sport Industry ही असणार आहे, जिथून या सर्व शाळांना स्पोर्टसची उपकरणे व साहित्य पुरविली जाणार आहेत. या संदर्भातील स्कीपिंग रोप बनविण्याचे काम सुरू झाले आहे आणि या मध्ये सुद्धा ब-याच लोकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
PPNFS हे एक भारतातील unique मॉडल असून जिल्हयात जास्तीत जास्त शाळांचे जाळे उभारण्यास मदत करावी व संपूर्ण देशामध्ये हे पायलट प्रोजक्ट रूजवण्यास हातभार लावावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी, कोल्हापुर यांचा mail ID subhash.sasne@gmail.com , subhash.sasne@gmail.com व मोबाईल 9970856438 वर संपर्क साधावा, असे आवाहनही मेजर सुभास सासने यांनी केले आहे.
Leave a Reply