
कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा आज वाढदिवस साजरा करणेत येत असून, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठवडाभर शहरामध्ये विविध स्पर्धा पार पडल्या तर येत्या काही दिवसात उर्वरित स्पर्धा पार पडणार आहेत. त्याचबरोबर आज शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांची सुरवात सकाळी १०.०० वाजता शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथून करण्यात येणार आहे. सकाळी शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे आमदार राजेश क्षीरसागर पदाधिकारी आणि शिवसैनिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करतील. तसेच महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आयोजित रिक्षा व्यावसायिकांच्या “आमदार चषक” क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ यावेळी पार पडणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या संघास आमदार चषक आणि रोख १० हजार रुपये, उपविजेत्या संघास उपविजेता चषक व रोख ७ हजार रुपये आणि तृतीय संघास मानचिन्ह आणि रोख ५ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे देणेत येणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कुष्ट खेळाडूना वैयक्तिक बक्षिसेही देणेत येणार आहेत.
यानंतर शिवसेना विभाग सदरबझार- विचारेमाळ यांच्या वतीने सिद्धाळा चौक, सदर बझार येथे केक कापून आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेछ्या देनेत येणार आहेत. सी.पी.आर अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे, अजित गायकवाड आणि सी.पी.आर कार्माचारी सेनेच्या वतीने सी.पी.आर आवारामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर संयुक्त जुना बुधवार पेठच्या वतीने तोरस्कर चौक येथे केक कापुन शुभेछ्या देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांना उदंड आयुष्य लागो असे साकडे घालण्याकरिता दसरा चौक ते बिंदू चौक रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर समस्त रिक्षा व्यावसायिक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन साकडे घालणार आहेत. यानंतर शिवसेना फेरीवाले सेनेच्या वतीने महाद्वार रोड येथे श्री अंबाबाई दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक आणि नागरिकांना प्रसाद वाटप करणेत येणार आहे. यानंतर युवा सेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अंध शाळा, मिरजकर तिकटी येथे अंध मुलांकरिता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेना विभाग मंगळवार पेठ, तालीम संस्था आणि मंडळाच्या वतीने कोळेकर तिकटी येथे केक कापून आमदार क्षीरसागर यांना शुभेछ्या देनेत येणार आहेत.
सायंकाळी ६.०० वाजता आमदार राजेश क्षीरसागर त्यांच्या निवासस्थानी शुभेछ्या स्वीकारणार आहेत. सायंकाळी सोन्या मारुतीचे दर्शन घेऊन शिवसेना शहर कार्यालय कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर समस्त शिवसेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक, सामाजिक संस्था, तालीम मंडळांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत आमदार राजेश क्षीरसागर केक कापून वाढदिवस साजरा करणार आहेत. यानंतर मुकेश हुजरे यांच्याकडून प्रबोधनकार ठाकरे बालसंकुलास रोख रु. १० हजारची आर्थिक मदत बालसंकुलाच्या मुलांकडे सुपूर्द केली जाणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी आणि अपंग सहाय्य सेनेच्या पाठपुराव्यामुळे अपंग व्यक्तींना महानगरपालिकेतर्फे मंजूर झालेल्या केबिनच्या मंजुरी पत्राचे वाटप आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर संबोधी बुद्ध विहार, आंबेडकर नगर या संस्थेस “बौद्ध विहार” बांधाण्याकरिता आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून १० लाख रु निधी मंजुरीचे पत्र सदर संस्थेस देण्यात येणार आहे.
Leave a Reply