विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवस साजरा

 

कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा दि.२४ नोव्हेंबर रोजी वाढदिवसाला सामजिक कार्याची किनार लाभली. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या सूत्रास साजेशा पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकांनी हा वाढदिवस साजरा केला.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठवडाभर शहरामध्ये विविध स्पर्धा पार पडल्या तर येत्या काही दिवसात उर्वरित स्पर्धा पार पडणार आहेत.
सामाजिक भान जपणारे आमदार, २४ तास जनसेवेसाठी उपलब्ध, अन्याया विरोधात सदैव लढणारे, दूरदृष्टीतून विकास साकारणारे नेतृत्व म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर… अशा सेवाभावी आमदारांचा वाढदिवस संपूर्ण शहरात सेवाभावी कृतीतून साजरा करण्यात आला.
शिवसेना, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनासह शहरातील विविध तालीम संस्था, मंडळे आणि शिवसैनिकांनी शहरात होर्डिंग आणि भव्य शुभेछ्या फलकासह आमदार राजेश क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या. सकाळ पासूनच आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेछ्या देण्याकरिता शिवसैनिक आणि हितचिंतकांनी रीघ लावली होती. सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कुटुंबियांसमवेत श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि श्री जोतिबाचे दर्शन घेतले. यानंतर शिवसेना शहर कार्यालय येथे शुभेछ्या स्वीकारल्या.
यानंतर शहरात आयोजित उपक्रमांची सुरवात सकाळी १०.०० वाजता शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथून करण्यात आली. सकाळी शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे आमदार राजेश क्षीरसागर पदाधिकारी आणि शिवसैनिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आयोजित रिक्षा व्यावसायिकांच्या “आमदार चषक” क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या संघास आमदार चषक आणि रोख १० हजार रुपये, उपविजेत्या संघास उपविजेता चषक व रोख ७ हजार रुपये आणि तृतीय संघास मानचिन्ह आणि रोख ५ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे देणेत आली. यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेवक श्रावण फडतारे, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक अशोक जाधव, संजय लाड, सागर यवलुजे, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, श्रीराम सोसायटीचे चेअरमन, सर्व संचालक, दिनकर उलपे, विजय मोरे, राजू काझी, राहुल माळी, अक्षय खोत, प्रकाश कोळी, रहीम पिंजारी, सचिन रोकडे, विष्णुपंत थोरवत, रविंद्र माने, रमेश पोवार, सुनील खेडकर, विष्णुपंत पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुभेछ्या स्वीकारल्या. कसबा बावडा परिसरातील अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर याना शुभेछ्या दिल्या.यानंतर शिवसेना विभाग सदरबझार- विचारेमाळ यांच्या वतीने सिद्धाळा चौक, सदर बझार येथे केक कापून आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेछ्या आल्या. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख राहुल चव्हाण, विभागप्रमुख शाम जाधव, खुद्बुद्दिन बेपारी, राजू ढाले, सुरज तोरणे आदी पदाधीकारी आणि शीख समाजाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. यानंतर सी.पी.आर अभ्यागत समिती आणि सी.पी.आर कार्माचारी सेनेच्या वतीने सी.पी.आर आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास डीन डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी सिव्हील सर्जन डॉ.एल.एस.पाटील, नगरसेवक नंदकुमार मोरे, नगरसेवक किरण शिराळे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे, अजित गायकवाड, डॉ.अजित लोकरे, उदय भोसले, कर्मचारी सेनेचे अनिल माने, सागर शिपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर संयुक्त जुना बुधवार पेठच्या वतीने तोरस्कर चौक येथे केक कापुन आमदार साहेबांना शुभेछ्या दिल्या. त्याचबरोबर क्रांतिवीर राजगुरू मंडळाच्या वतीने रा. शाहू विद्यालय, जुना बुधवार पेठ येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, नागेश घोरपडे, अनिल निकम, धनंजय सावंत, संतोष दिंडे, उमेश जाधव, सुशील भांदिगरे यांच्यासह जुना बुधवार परिसरातील विविध तालीम संस्था आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांना उदंड आयुष्य लागो असे साकडे घालण्याकरिता दसरा चौक ते बिंदू चौक रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रिक्षा रॅलीची सुरवात दसरा चौक येथून करण्यात आली. ही रिक्षा रॅली बिंदू चौक येथे आल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रिक्षा व्यावसायिकांच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करून केक कापला. यावेळी बिंदू चौकात फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर समस्त रिक्षा व्यावसायिकानी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उदंड आयुष्यासाठी साकडे घातले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे अल्लाउद्दिन नाकाडे, सुनील खेडकर, राजू काझी, विष्णुपंत पोवार आदी रिक्षा व्यावसायिक व्यावसायिक उपस्थित होते. यानंतर शिवसेना फेरीवाले सेनेच्या वतीने महाद्वार रोड येथे श्री अंबाबाई दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक आणि नागरिकांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करणेत आले. यावेळी फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख धनाजी दळवी, विशाल कावळे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, सागर कावळे, संजय लोकरे, महेश पोवार, राजेंद्र खोचरे, योगेश भोगम, विजय खांडेकर, अजय जाधव, आप्पा गावडे, विनय दळवी, संदीप जितकर, राजेंद्र बोरगावकर, आनंदराव मोळे आदी उपस्थित होते. यानंतर युवा सेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अंध शाळा, मिरजकर तिकटी येथे अंध मुलांकरिता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंध मुलांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेछ्या देत आभार मानले. यावेळी युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन शिंदे, अविनाश कामते, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, प्रशांत जगदाळे, शिव माथाडी आणि जन.कामगार सेनेचे शहरप्रमुख राज जाधव, देवराज ढवळे, अमर पाटील, प्रीतेश माने, सागर गायकवाड, सौरभ कुलकर्णी आदी युवासैनिक उपस्थित होते. त्याचबरोबर शिवसेना विभाग मंगळवार पेठ, तालीम संस्था आणि मंडळाच्या वतीने कोळेकर तिकटी येथे केक कापून आमदार क्षीरसागर यांना शुभेछ्या देनेत आल्या. यावेळी महिलांकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचे औक्षण ओवाळून आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हरुगले, गजानन भुर्के, विजय देसाई, भाई जाधव, रुपेश रोडे, विश्वनाथ माळकर, पिंटू हारुगले, सौरभ हारुगले, महिला आघाडीच्या सौ.मेघना पेडणेकर, सौ. गौरी माळदकर यांच्यासह भागातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. त्याचबरोबर राजारामपुरी विभागच्यावतीनेही केक कापून आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेछ्या देण्यात आल्या. यावेळी शिवसेना गटनेते नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेवक अभिजित चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, शिवसेना उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, विशाल देवकुळे, आझम जमादार, रघुनाथ टिपुगडे, मंदार तपकिरे, योगेश शिंदे, श्री आयरेकर, इजाज शिकलगार, विशाल देशपांडे, अमित माने, संजय राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी ६.०० वाजता आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवासस्थानी शुभेछ्या स्वीकारल्या. सायंकाळी सोन्या मारुतीचे दर्शन घेऊन शिवसेना शहर कार्यालय कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समस्त शिवसेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक, सामाजिक संस्था, तालीम मंडळांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत आमदार राजेश क्षीरसागर केक कापून वाढदिवस साजरा करणार केला. यावेळी कार्यक्रम स्थळी भव्य आतषबाजी करण्यात आली. यानंतर img-20161124-wa0003 मुकेश हुजरे यांच्याकडून प्रबोधनकार ठाकरे बालसंकुलास रोख रु. १० हजारची आर्थिक मदत बालसंकुलाच्या मुलांकडे सुपूर्द केली गेली. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी आणि अपंग सहाय्य सेनेच्या पाठपुराव्यामुळे अपंग व्यक्तींना महानगरपालिकेतर्फे मंजूर झालेल्या केबिनच्या मंजुरी पत्राचे वाटप आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लक्ष्म्न घुगरे, अजय सोनुले, संजय काळे, दीपक माणगावे आदीना करण्यात आले. यावेळी अपंग सेनेचे शहरप्रमुख अनिल मिरजे उपस्थित होते. त्याचबरोबर संबोधी बुद्ध विहार, आंबेडकर नगर या संस्थेस “बौद्ध विहार” बाधाण्याकरिता आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून रु.१० लाख निधी मंजुरीचे पत्र सदर संस्थेस देऊन, या वाढदिवसाला सामाजिक कार्याची किनार लावली. यावेळी आपल्या लाडक्या नेतृत्वाला शुभेछ्या देण्याकरिता शहरवासीय, हितचिंतक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संखेने गर्दी केली.
दरम्यान दिवसभरामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्याजी ठाकरे, पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सा.बा. मंत्री ना.एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते, उद्योगमंत्री  सुभाष देसाई, आरोग्यमंत्री ना. दीपक सावंत, गृहराज्य मंत्री ना.दीपक केसरकर,जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, महापौर अश्विनी रामाने, खासदार विनायक राउत, खासदार अनिल देसाई, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार डॉ.सुजित मिनचेकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार सत्यजित पाटील, आमदार नीलमताई गोऱ्हे, आमदार वैभव नाईक, शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवाडकर, सह संपर्कप्रमुख संजय मंडलिक, भाजप महानगरजिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अमित सैनी, आयुक्त पी शिवशंकर आदी मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेछ्या दिल्या.
तर शिवसेना गटनेते नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेवक अभिजित चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक सचिन चव्हाण,प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर विलासराव सासणे, माजी उपमहापौर उदय पवार,  सुभाष वोरा, आर.के. पोवार, बाबा पार्टे, माजी नगरसेवक वसंत कोगेकर, शहर अभियंता सरनोबत, माजी नगरसेविका स्मिता माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, नगरसेवक किरण शिराळे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, उद्योजक सदानंद कोरगावकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रा.विजय कुलकर्णी, विनायक साळोखे, दीपक गौड, सांगवडे सरपंच विष्णुपंत चौगुले, बार असो. अध्यक्ष अॅड प्रकाश मोरे आदी मान्यवर शुभेच्या देण्याकरिता कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!