मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे आक्रोश आंदोलन

 

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दसरा चौकात मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन img-20161128-wa0015करत जोरदार निदर्शनं करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आणि शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे 15 दिवस सामान्य नागरिकांना नोटा बदलण्याचा आणि बँकेत नोटा भरण्याचा तसेच पैसे काढण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. देशभरात तब्बल 76 लोकांना बँकांच्या दरातील रांगेतच प्राण गमवावा लागला होता. अशा परिस्थितीत जिल्हा बँकांवरही रिझर्व्ह बँकेने काही काळ चलनातून रद्द झालेल्या नोटा न स्वीकारन्याचे निर्बंध लादले. यामुळे शेतकऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा बँकेतून मिळणारं दुधाचे बिलही दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैशा अभावी मिळत नाही. अशा या शेतकरी, कष्ठकरी आणि सामान्य जनतेच्या विरोधात केंद्र सरकार निर्णय घेत आहे. आणि अडाणी, अंबानी, विजय माल्या यांचं कर्ज माफ या भाजप सरकारकडून केलं जात आहे. या सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे दसरा चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या हितापेक्षा उद्योजक अडाणी आणि अंबानी यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे या भाजप सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवत असल्याचं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितलं
यावेळी माजीमंत्री जयवंतराव आवळे, जिल्हापरिषेदेच्या अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी महापौर अश्विनी रामाने, महिला बाल कल्याण समिती सभापती वृषाली कदम, करवीर पंचायत समिती सभापती स्मिता गवळी, काँग्रेसचे सरचिटणीस ऍड सुरेश कुऱ्हाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक तौफिक मुल्लानी सारलाताई पाटील, संध्या घोटने, चांदा बेलेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!