

चेन्नई:तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता (वय 68) यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. अपोलो रुग्णालय प्रशासनाने रात्री 12 वाजता मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. दरम्यान, तामिळनाडूवर शोककळा पसरली असून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
रविवारी जयललिता यांची हृदयक्रिया बंद पडल्याने (कार्डियाक अरेस्ट) सोमवारी पहाट े त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती; पण त्यांची प्रकृती अतिशय नाजूक बनल्यामुळे त्यांना विविध उच्च दर्जाच्या जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. सहावेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविणार्या जयललिता यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला असून ‘अम्मा अम्मा…’ अशा घोषणा देत लाखो समर्थक आक्रोश करत आहेत. राज्यात प्र्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निमलष्करी जवानांची कुमकही मागवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सोमवारी सायंकाळी अपोलो रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले होते. रविवारी जयललिता यांना कार्डियाक अरेस्टचा धक्का बसल्यानंतर सोमवारी पहाटे त्यांच्यावर तज्ज्ञ
डॉक्टरांच्या पथकाने अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली; पण त्यांची प्रकृती अतिशय नाजूक बनल्यामुळे त्यांना विविध उच्च दर्जाच्या जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, तामिळनाडूतील वातावरण प्रचंड तणावाचे आणि गंभीर बनल्याने राज्यात प्र्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. निमलष्करी जवानांची कुमकही मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जयललिता यांच्यावर अपोलो रुग्णालयात 74 दिवसांपासून उपचार सुरू होते. ताप आल्यामुळे त्यांना 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत गेल्या दोन महिन्यांत अनेकदा चढउतार आले. सुरुवातीला जयललिता यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. महिन्याभरापूर्वी त्यांना विशेष उपचार विभागात हलवण्यात आले होते. रविवारी अपोलो रुग्णालय प्रशासनाने मेडिकल बुलेटिन जारी करून जयललिता यांची प्रकृती आता सुधारली असून लवकरच त्या पूर्ववत नित्याची कामे करू लागतील, असे स्पष्ट केले होते; पण त्यानंतर थोड्याच वेळात जयललितांना कार्डियाक अरेस्टचा धक्का बसला. अपोलो रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. लंडनच्या डॉ. रिचर्ड बेले यांच्याशी संपर्क साधून त्यांचाही सल्ला घेण्यात आला. दरम्यान, हे वृत्त समजताच रविवारी सायंकाळपासूनच जयललितांच्या समर्थकांनी अपोलो रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केल्यामुळे सुमारे 200 पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते.
Leave a Reply