
कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या हसिना बाबू फरास यांची बहुमताने गुरुवारी निवड झाली. तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने यांची निवड झाली. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा मुस्लिम महिला महापौर झाल्या. श्रीमती फरास यांना ४४ तर ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांना 33 मते मिळाली . शिवसेनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला .
महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसिना फरास यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड झाली. महापौर पदासाठी झालेल्या मतदानात फरास यांनी विरोधी ताराराणी आघाडीच्या स्मीता माने यांचा ११ मतांनी पराभव केला. कोल्हापूरच्या महापौरपदी पहिल्यांदाच मुस्लिम महापौर म्हणून हसिना फरास विराजमान झाल्या आहेत.
महापालिकेवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. सध्या महापालिकेत या आघाडीचे ४४ सदस्य आहेत. तर विरोधी ताराराणी आघाडीचे ३३ सदस्य आहेत. एक वर्षापूर्वी झालेल्या निडणुकीत पहिल्या वर्षी काँग्रेसकडे महापौरपद आणि राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद देण्यात आले होते. आता एक वर्षानंतर राष्ट्रवादीकडे महापौरपदाची सुत्रे आली आहेत. त्यानुसार हसिना फरास यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली. तर अर्जुन माने यांना उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून संधी देण्यात आली.
Leave a Reply