
कोल्हापूर : ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्यासह बहूजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी कोल्हापुरात संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह सीमाभागातून हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाला सुरुवात दसरा चौक येथून झाली. व्हीनस कॉर्नर, बसंत बहारा रोड मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला. तेथे या मोर्चाची राष्ट्रगीताने सांगता झाली. यावेळी प्राणाली बनगे, उषा कांबळे, ज्योती बुध्याळकर, प्राची कांबळे आणि क्रांती कांबळे, अवंती दिघे, दिपाली कांबळे, स्नेहल माळी या विद्यार्थिनींनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात प्रचंड गर्दी होती त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली होती. शिस्तबद्धपणे हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी निळ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच हातात निळे ध्वज घेतले होते
Leave a Reply