
कोल्हापूर:अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी घटतेनील दोषींवर तत्काळ कारवाई करा, या व अशा अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात होणार्या बहुजन क्रांतीच्या मोर्चानिमित्त ऐतिहासिक दसरा चौकात भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज, बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या महामानवांच्या स्मारकास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. मुस्लिम लॉ बोर्डाच्या कायद्याला हात लावू नये, असे फलक घेऊन आम्हालाही सन्मानाने जगू द्या, अशी मागणी ते करत होते. बुरुड, गोसावी, बेलदार, घिसाडी, गोंधळी, कोल्हाटी, गोपाळ, नंदिवाले, माकडवाले आदी समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Leave a Reply