
कोल्हापूर : शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात मुंबई येथे होणार असून या स्मारकाचे भुमीपुजन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज पंचगंगा नदीघाट परिसर येथे सकाळी ९ वाजता स्मारकाच्या या भुमीपुजनाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पवित्र नद्यांचे जल व जिल्ह्यातील ऐतीहासीक किल्ले व स्मारके येथील माती यांच्या कलशांचे पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासीक परंपरा दर्शवणारा चित्ररथ या कलशांसाठी सजवण्यात आला होता. बाल शिवाजी, मावळे, घोडेस्वार आदिंच्या रुपांतील बालकलाकार, छत्रपती शाहु महाराज हायस्कुलचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी या चित्ररथाचे महिलांनी स्वागत केले. हा चित्ररथ पंचगंगा नदी मार्गे- गंगावेश – रंकाळवेश- बिनखांबी गणेश मंदीर- महाद्वार रोड – पापाची तिकटी – महापालिका चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचला. याठिकाणी आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आम.सुरेश हाळवणकर, आम.अमल महाडीक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, गोकुळचे संचालक बाबा देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महापालिका गटनेते विजय सुर्यवंशी इ.प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जल व दुग्धाभिषेक करण्यात आला.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महारजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटावरील मातीचे व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पवित्र नद्यांच्या जलाचे पुजन करण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आम.अमल महाडीक, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाजपा नेते महेश जाधव, आम.सुरेश हाळवणकर आदीं मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर हा शिवपदस्पर्श रथ नृसिंहवाडी येथे पाणी पुजनासाठी रवाना झाला. नृसिंहवाडी येथील कार्यक्रमानंतर हा रथ मुंबईकडे रवाना होणार आहे.
याप्रसंगी विजय जाधव, राहुल चिकोडे, संतोष भिवटे, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, शिवाजी बुवा, हेमंत आराध्ये, श्रीकांत घुंटे, अमोल पालोजी, संदीप कुंभार, गणेश देसाई, सुरेश जरग, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, आशिष ढवळे, संतोष गायकवाड, किरण नकाते, माजी नगरसेवक आर.डी.पाटील, अॅड.संपतराव पवार, नगरसेविका मनिषा कुंभार, उमा इंगळे, सविता भालकर, गिता गुरव, जयश्री जाधव, अश्विनी बारामते, मधुमती पावनगडकर, दिपक काटकर, सतीश पाटील- घरपणकर, नचिकेत भुर्के, हेमंत कांदेकर, पपेश भोसले, जयराजसिंह निंबाळकर, कुलदीप देसाई, धैर्यशील देसाई, आप्पा लाड, सर्जेराव जरग, विवेक कुलकर्णी, विजय गायकवाड, संतोष माळी, डॉ.सदानंद राजवर्धन, राजू मोरे, हितेंद्र पटेल, अनिल काटकर, गिरीष गवंडी, विजय अग्रवाल, सयाजी आळवेकर, संजय सावंत, संतोष जाधव, यशवंत कांबळे, भारती जोशी, किशोरी स्वामी, वैशाली पसारे, प्रभा इनामदार, सुलभा मुजूमदार, प्रभा टिपुगडे, कविता पाटील, रजनी भुर्के, आकुताई जाधव, शशिकला मोरे, सुनीता सुर्यवंशी, त्याच प्रमाणे युवा मोर्चाचे दिग्विजय कालेकर, अक्षय मोरे, महेश मोरे, सुजय मेंगाणे, विजय सुतार, सुभाष वोरा, गिरीष साळोखे, विश्वजीत पोवार, पारस पलिचा, गोविंद पांडीया, पुष्कर श्रीखंडे, अमोल नागटिळे, अनिकेत मोरे आदींसह पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply