

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक किर्तीच्या स्मारकाची आज मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न झालं.पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेली माती आणि जल शिवस्मारकाच्या नियोजिक ठिकाणी अर्पण केली. त्यानंतर पूजा झाली आणि भूमिपूजनाच सोहळा संपन्न झाला.भूमिपूजनच्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि संभाजीराजे उपस्थित होते.
अरबी समुद्रातील 16 हेक्टर आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा धातूचा अश्वारुढ भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे. या स्मारकाला एकूण 3600 कोटी इतका खर्च येणार आहे. स्मारकासोबत शिवकालीन इतिहास आणि अनेक अद्यायावत सुविधा याठिकाणी असणार आहेत.
Leave a Reply