कोल्हापूर:पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विशेष अन्वेषण यंत्रणेने (एस्आयटीने) केलेल्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर तात्काळ उघड करावा आणि शिवाजी विद्यापिठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्यासाठी येत्या उन्हाळी अधिवेशनात ही दोन्ही विधेयके मांडली जातील. वरील तीन विषय समितीच्या साहाय्याने उन्हाळी अधिवेशनात मांडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हे दोन्ही विषय शासनाला मान्य करावीच लागतील. असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी येथे केले. येथील शिवाजी विद्यापिठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शिवाजी चौकात सकाळी ११.३० वाजता तुतारीनाद आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या आंदोलनात १५० विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, कागल तालुकाप्रमुख किरण कुलकर्णी, किशोर घाडगे, शशी बिडकर, नागाव शाखाप्रमुख तानाजी मगदूम, केर्लीचे शाखाप्रमुख भीमराव पाटील, शिवसेनेचे विराज ओतारी, हिंदु एकता आंदोलनाचे शिवाजीराव ससे, मिलिंद बराले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, धनगर महासंघाचे यशवंतराव शेळके, श्री संप्रदायाचे मारुती यादव, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, बागल चौक तरुण मंडळाचे दत्तात्रय पाटील, जय शिवराय मंडळाचे किशोर माने, ऋतुराज माने, शिवतीर्थ सेवा संघाचे आनंदा मकोटे, धर्माभिमानी चंद्रशेखर गुरव, देवराज सहानी, संग्राम घोरपडे, किरण हंगे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, डॉ.सौ. शिल्पा कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सर्वश्री मनोज खाडये यांसह कार्यकर्ते, रणरागिणी शाखेच्या सौ. अंजली कोटगी, सौ. सुरेखा काकडे आदी धर्माभिमानी सहभागी झाले होते. या वेळी धर्माभिमान्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी विद्यापिठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, असे नामकरण झालेच पाहिजे, अशा घोषणांनी शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.
Leave a Reply