
कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथे २६ व २७ डिसेंबर २०१६ रोजी ग्रामोत्सव व सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी आज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्यासह विविध राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उदघाटन झाले.
श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ येथे संपन्न झालेल्या विशाल भारतीय संस्कृती उत्सवाला २ वर्ष होत आहेत. अजून हि या उत्सवाच्या आठवणी सर्वांच्या मनात स्मरणात आहेत, त्या आठवणींना उजाळा म्हणून मागील वर्षीपासून “ग्रामोत्सवाचे” आयोजन केले जाते. या ग्रामोत्सवात ग्रामीण भारतीय उत्सव, कला-आविष्कार, पारंपरिक नृत्य, ढोल वादन, लेझीम, झाज पथक, मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा, ग्रामीण नाट्य यासह विविध ग्रामीण संस्कृतीचे सार्थ दर्शन होणार आहे. २६ डिसेंबरला संध्याकाळी लोकोत्सवात देशभरातील विविध नृत्याविष्कार व प्रेरक नाट्याविष्कार संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी हृदयनाथ सिह (राष्ट्रीय संगठक, भा.ज. पा. गोवंश विकास, पंचायतराज, किसान मोर्चा व नमामि गंगे), विजयपाल सिहं तोमर (राष्ट्रीय अध्यक्ष, किसान मोर्चा, भाजपा), कुंवर पुष्पेंद्र सिहं चंदेल (खासदार, हमीरपूर,उत्तरप्रदेश) धनंजय महाडिक (खासदार, कोल्हापूर), डॉ. एल. नारायण रेड्डी (आंतराष्ट्रीय शेती तज्ञ), आमदार अमोल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सह विविध अनेक तज्ञांची उपस्थिती लाभणार आहे.
शेतकरी स्वयंपूर्ण झाला पाहिजे त्याकरिता उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे,३०० रुपयात एकरी NPK कसा तयार करायचा,बाजारात ४००० रुपये लिटर मिळणारे पेस्टीसाइड,घरच्या घरी फक्त ८०/-रुपयात बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या शिबिरात पाहायला मिळणार आहेत. या कार्यशाळेत सेंद्रिय उत्पादन ,उत्पादन मालावर प्रक्रिया ,मार्केर्टिंग , नत्र स्पुरद आणि पालाश खते , सेंद्रीय किटक नाशके टॉनिक हे घरी आणि तेही 10% किमतीत कसे बनवायचे यासाठी प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे पोलंडच्या संसदेने सेंद्रीय शेतीवर प्रबोधन करण्यास ज्या एकमेव भारतीय तज्ञांस निमंत्रित केले ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.एल.नारायण रेड्डी (सेंद्रीय शेतीचे चालते-बोलते विद्यापीठ) यांनी कार्यशाळेत शिबिरार्थींना संबोधित करणार आहेत. कार्यशाळेच्या निमित्ताने सेंद्रिय पध्दतीतून एनपीके खताची निर्मिती, सेंद्रिय वाढ संप्रेरके तसेच कीडनाशकांची निर्मिती याची माहिती दिली जाईल. शास्त्रज्ञ डॉ.एल.नारायण रेड्डी यावेळी प्रात्यक्षिकांसहीत माहिती देणार आहेत.देशी गोवंशांचे प्रकार, गायीच्या दुग्ध पदार्थांचे महत्व याविषयांवर देखील सखोल मार्गदर्शन शेतक-यांना केले जाते. कार्यशाळेत डॉ.एल.नारायण रेड्डी व अन्य शेती तज्ञ शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय एक एकरमध्ये १०० पिके घेण्याचा अनोखा प्रयोग व भारतीय गोवंश संपूर्ण 23 प्रजातीची सुमारे ८०० गायींची भव्य गोशाळा , इंजिनिअरिंग कॉलेज चे विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या संवादातून अल्प भुधारक शेतकर्यांसाठी तयार केलेली छोटी यंत्रे शेतक-यांना इथे पाहायला मिळणार आहे.कार्यशाळेत सहभागी होणा-या शेतक-यांसाठी निवास आणि भोजनाची मोफत सोय केली आहे. भाजपा केंद्रीय कृषीमंत्री राघामोहन सिंह यांनी किसान कृषि प्रशिक्षण शिबीराचे ऊद्घाटन केले.सोबत काडसिघ्देश्वर महाराज,आण्णा डांगे,राज्यमंत्री सदाभाऊ खोत,खासदार धनंजय महाडीक,संजय पाटील,आमदार सुरेश हळवणकर,आमदार अमल महाडीक व राष्ट्रीय संघटक हदयनाथ सिंग,कुंवर चंदेल उपस्थित होते.
Leave a Reply