कोल्हापूर: गावातील तंटे गावपातळीवरच सामोपचाराने मिटविले जावेत आणि भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत या दृष्टीने लोकसहभागातून प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणून शांततापूर्ण, रचनात्मक समाजाची जडण-घडण व्हावी आणि त्यातून लोकांनी स्थायी विकासाच्या मार्गावरुन वाटचार करावी अशा व्यापक उद्देशाने 15 ऑगस्ट 2007 पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु करण्यात आली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीरीत्या राबविण्यामध्ये पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना जिल्हा, विभाग व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी तीन पुस्कार देण्यात येतात. सन 2014-15या मोहिम अंमलबजावणीच्या वर्षातील, वृत्तपत्रांच्या बातमीदारांचे पुरस्कार गृह विभागाच्या 1 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील मेहरुन नाकाडे यांना तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सचिन गाडेकर यांना तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील संजय बनारसे यांना घोषित झाला आहे. प्रथम क्रमांकासाठी 2 लाख 50 हजार, द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 1 लाख इतक्या रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
Leave a Reply