
बेसनचे लाडू
प्रमाण : १ किलो
साहित्य:१/२ किलो चणा डाळीचे जाडसर पीठ१ वाटी वनस्पती तूपदीड वाटी साखर५-६ वेलच्याथोडं जायफळ२ चमचे चारोळी१५-२० बेदाणेवेळ: १ ते २ तासकृती:सर्व प्रथम कढईत तूप तापवा.तूप तापल्यावर डाळीचे पीठ घालून सतत परतत राहा. परतताना चमच्याने पीठ दाबून पिठाच्या गुठया मोडत राहाव्यात.मंद आचेवर २०-२५ मिनिटे बेसन परतावे. बेसन भाजत आले कि बेसन मधून तूप सुटू लागते.परतताना तूप चमकू लागले व बेसन लाल रंगाचे होऊन खमंग वास सुटला कि बेसन ताटात ओतावे.बेसन थंड झाल्यावर साखर मिक्सरमध्ये दळून मिसळावी.तसेच वेलची-जायफळ पाउडर, चारोळी घालून बेसन हाताने मळावे व एकेक लाडूला एक बेदाणा लावून लाडू वळावेत.तयार लाडू खाण्यासाठी सर्व्ह करा.
नोंद:कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपा ऐवजी साजूक तूप घेतल्यास कमी लागते व लाडू खमंग होऊन मऊ राहतात.
Leave a Reply