शहरामध्ये आज राष्ट्रीय मतदार दिन रॅली

 

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी 8.30 वाजलेपासून शहरातून भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीचे कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिलदार कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, एन.सी.सी., एन.एस.एस.चे विद्यार्थी/विद्यार्थींनी, महिला बचत गटाच्या महिला मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.
सुरुवातीस बिंदू चौक येथे नेहरु युवा केंद्राच्यावतीने जनजागृतीपर पथनाटय सादर करण्यात येईल. त्यानंतर जनजागृती रॅलीस प्रारंभ होईल. ही बिंदू चौक-शिवाजी पुतळा-महानगरपालिका-टाऊन हॉलमार्गे दसरा चौक शाहू स्मारक भवन येथे विसर्जीत होणार आहे. या रॅलीमध्ये नागरिकांना मतदार यादीमध्ये नांव नोंदविणेबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक विʉाास नांगरे-पाटील नवमतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रक /बिल्ले वाटप व बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. तरी याचा लाभ नवमतदारांनी घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने संपुर्ण दिवसभर मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या जाहिरातीचे प्रसारण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या एका वाहनांवर एल.ई.डी.स्क्रिन लावण्यात येणार आहे. या वाहनाद्वारे संपुर्ण शहरात या जाहिरातीचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील भवानी मंडप, शिवाजी चौक व दाभोळकर कॉर्नर व इतर ठिकाणी असलेल्या डिजीटल स्क्रिनवरही या जनजागृतीपर जाहिरात व्हिडिओचे प्रसारण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!