कोल्हापूर:युवा संघाचे कार्य उल्लेखनीय असून लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसारमाध्यमातील पत्रकारांनी एकत्रित येऊन विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करणे ही साधी गोष्ट नाही.या व्यक्तींना त्यांच्या भविष्यात असेच प्रोत्साहन मिळावे यासाठीच युवा पत्रकार संघ नेहमीच कार्यरत असतो.कोणत्याही निधीची अपेक्षा न करता समाजाचे आपण देण लागतो ही एकच भावना या संघातील पत्रकारांच्या मनात असते.आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन ही संस्था आपले कार्य नेटाने करत आहे.असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी पुरस्कार वितरण आणि वर्धापनदिन सोहळ्यात काढले.अध्यक्षस्थानी कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर हसिना फरास होत्या.तसेच शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.गेल्या सात वर्षात संघाने चांगले काम केलेले आहे.त्यांचे हे कार्य गौरविण्यासारखेच आहे,पत्रकार हा नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य करतो त्यामुळे अश्या संघटनेबद्दल मला नेहमीच आपुलकी वाटते अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो.पत्रकारांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या या संस्थेचा आज सातवा वर्धापन दिन आहे.त्यानिमित्त मला या कार्यक्रमास येण्याचे भाग्य मिळाले संघाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यामध्ये नगरसेवक राहुल चव्हाण,यशस्वी विद्यार्थिनी वैष्णवी कोठावळे,पत्रकार शुभांगी तावरे,तायक्वांदोपटू अमोल भोसले यांचा समावेश होता.स्मृतिचिन्ह आणि मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.संघाचे राजाध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी प्रास्ताविकात संघाची भूमिका मांडली.कार्यक्रमास शाहूपुरी डिविजनचे महाडिक,सामाजिक कार्यकर्ते अशोक भंडारे,विविध माध्यमातील पत्रकार,छायाचित्रकार,नागरिक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता उपाध्यक्ष रतन हुलस्वार,सचिव रविराज कोल्हटकर,पत्रकार सदस्य नियाज जमादार,गौरव यादव,प्रकाश कांबळे,सुभाष गायकवाड,सुशांत पोवार,अक्षय थोरवत,कबीर हजारी,सुरेश राठोड,उदय साळोखे,बाबुराव वळवडे,कमलाकर वर्टेकर,संदीप शिंदे,संतोष हिरवें आणि योगेश शहा यांनी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष पंडितराव कर्णिक यांनी केले.कार्यक्रमास प्रसिद्ध गायक सुनील ठाणेकर यांच्या वाद्यवृंदामुळे वेगळीच रंगत चढली.
Leave a Reply