कोल्हापूर: लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित साहील ग्रुपची उत्पादने आपला दर्जा आणि गुणवत्ता राखत ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाली आहेत.अल्पावधीतच ग्राहकांची मने जिंकतील, असा विश्वास ग्रुपचे कार्यकारी संचालक सुनील बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केला.
मार्केट यार्ड येथील रामकृष्ण लॉन येथे साहील ग्रुपच्या साहील टेस्टी फूड अँड ब्रेव्हरेजस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रॉडक्ट लाँचच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्पादने आणि कंपनीबद्दल माहिती देतान चव्हाण म्हणाले, 2009 पासून सुरवात झालेला व्यवसाय साहील ग्रुप या नावे 2010 मध्ये ओळखला गेला. त्यावेळी पिण्याचे पाणी या क्षेत्रात स्वतःची ओळख झाल्यानंतर साईरीच या नावे मसाल्याचे आठ प्रकार, सर्व प्रकारचे जॅम, कॅचप, सात प्रकारचे ज्यूस,प्युअर बाजरी कुकीज, सॉफ्ट ड्रिंक्स व सर्व प्रकारचा पिण्याचा सोडा बाजारात आणत आहोत.ते म्हणाले, साहील ग्रुप अंतर्गत आमचे तीन ब्रँड असतील. त्यामध्ये साईरीच हा राष्ट्रीय ब्रँड असेल, गोवन चॉईस हा खास गोवा येथील लोकांच्यासाठी असेल व मदर टेस्ट यामध्ये घरगुती उत्पादनांची विक्री केली जाईल. ज्याचे उत्पादन बचत गटांच्याकडून केले जाणार आहे. याद्वारे महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार आहोत. महत्त्वाच्या 40 उत्पादनांची विक्री केली जाईल. यामध्ये साधारण 150 उपप्रकार असतील, तर मार्चनंतर नमकीन आणि ग्रोसरी क्षेत्रात कंपनी उतरणार आहे.दरम्यान, यावेळी प्रॉडक्ट फॅशन शो,करमणुकीचा कार्यक्रम होऊन कंपनीचे उत्पादन आणि भविष्यातील उद्योग विस्ताराविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
निसार ट्रान्स्फॉर्मस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व साहीलचे असोसिएडेट पार्टनर निसाल शिकलगार, क्रिएटिव्ह डायरेक्टर ताहीर हुसेन कुरणे आदी उपस्थित होते.
Leave a Reply