कोल्हापूर: याटिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर ही न नफा मिळवणारी संस्था आहे.या संस्थेमार्फत कोल्हापूर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरातील धाडसीमुले,महिला आणि अन्य ज्यांना थरार आणि साहसी खेळांची आवड आहे या सर्वांसाठी याटिंग सेल्स हा गेम रंकाळा तलाव येथे २७ ते ३१ जानेवारी दरम्यान कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध केला असून ऑलम्पिकमधेही ज्या गेमचा समावेश आहे असा दुर्मिळ गेचा थरार लोकांना अनुभवायला मिळणार आहे.पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला हा गेम कोल्हापुरात आणण्यासाठी महापालिका,शासन,हॉटेल मालक संघ यांच्यासह सर्व कोल्हापूरचा सहयोग मिळाला आहे.७ ते १५ आणि १५ ते १८ या वयोगटातील तरुणांना तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि अश्या मुले व तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढील वाटचालीसाठी पाठविणार आहोत.असा गेम खेळविणारी महाराष्ट्रातील ही पहिली संस्था आहे.या गेमला प्रोत्साहन देण्यासाठी सिने अभिनेता स्वप्नील जोशी,सोनाली कुलकर्णी,नाना पाटेकर,पोलिस अधिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.अशी माहिती चाम्पियान तारामती मात्तीवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता फक्त वारा आणि पाण्याशी दोन हात करत हा गेम खेळला जातो.यासाठी कोल्हापुरात अत्याधुनिक यंत्रणेसह आणि सुरक्षिततेसह सज्ज आहोत.यानिमित्ताने कोल्हापूरच्या धाडसी लोकांना नवीन संधी उपलब्ध होत आहे.याचा लाभ त्यांनी घ्यावा असेही तारामती मात्तीवाडे म्हणाल्या.पत्रकार परिषदेला अक्षय पुजारी,संजय कुडचे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक उपस्थित होते.
Leave a Reply