निवडणूक निकालाचा लेखाजोखा

 

नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला.यामुळे जिल्ह्यातील नेत्यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. लोकांनी आपला कौल प्रामाणिकपणे दिल्याने जे भ्रमात होते त्यांचे पाय जमिनीवर आले.आपण लोकांना गृहीत धरत होतो.पण जनताच सर्वश्रेष्ठ असते.त्यांना असे गृहीत धरले तर काय परिणाम होतात याची प्रचीती नक्कीच यांना आली असेल.राज्यपातळीवर झालेल्या कुरघोड्या आणि आरोप प्रत्यारोप याचा परिणाम भाजप आणि शिवसेनेला नक्कीच इथे भोगावा लागला.याउलट कोणताही गाजावाजा न करता कासवाच्या गतीने जाऊन आधीचे सर्व पराभव आणि नामुष्की हेच आपले बळ असे समजून  पुन्हा स्फूर्ती घेऊन सतेज हात सदैव साथ म्हणत लोकांचा विश्वास जिंकला. लोकांना कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको असतो. अती तिथे माती अशी गत शिवसेनेची झाली असे म्हणायला हरकत नाही. निवडणुकीपुरते एकत्र यायचे आणि पुन्हा आपले वाद चव्हाट्यावर आणायचे याचा आता लोकांनाच कंटाळा आलाय म्हणूनच शिवसेनेची दाणादाण उडाली.कदाचित भाजपने ताराराणीशी युती केली नसती तर भाजपची अवस्थाही शिवसेनेसारखीच झाली असती.पण महायुती झाल्याने बऱ्यापैकी भाजपचे पारडे जड झाले.३ अपक्ष वगळता इतर कुठल्याही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीची सत्ता महापालिकेवर येणार हे नुकतेच निश्चित झाले.यात कॉंग्रेसचा महापौर म्हणजे पुन्हा जुना फोर्मुला लागू होणार हे स्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!