
कोल्हापूर: गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात गोशिमा आणि एनकेजीएसबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थ क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यासंगी डॉ.विनायकराव गोविलकर यांचे नोटाबंदी-उद्दिष्ट आणि परिणाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन ७ तारखेला मंगळवारी सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे केले आहे अशी माहिती अध्यक्ष जे.आर.मोटवानी,संचालक विश्वजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ.गोविलकर हे उद्योग.व्यापार आणि शिक्षण या तीनही क्षेत्राशी निगडीत असून गेली अनेक वर्षे त्यांनी २० पुस्तके,१२ पुस्तिका,आणि ५०० पेक्षाही जास्त लेख त्यांनी लिहिले आहेत.३५ वर्षे ते चार्टर्ड अकाऊंटट म्हणून कार्यरत आहेत.हॉंगकॉंग येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या पाचव्या मंत्री परिषदेत त्यांनी सहभाग घेतला आहे.अशा जागतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळणार आहे.यांनतर नोटाबंदी,अर्थसंकल्प आणि कॅशलेस व्यवहार या सर्व विषयांवर डॉ.गोविलकर प्रश्नांचे निरसन करणार आहेत.तरी या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोशिमा आणि एनकेजीएसबीच्यावतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संग्राम पाटील, उद्योगपती चंद्रकांत जाधव,मोहन पंडितराव,ब्रांच मॅनेजर वैद्य,निखील मोगरे यांच्यासह संचालक,कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply