
कोल्हापूर: इंटिग्रेटेड लेगसी या कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध रॉक बँडचे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्त्रीशक्तीच्या गीताची निर्मिती केली असून यामधून स्त्री शक्तीचा जागर दाखविण्यात आला आहे.हे गीत सध्या यु ट्यूब,आय ट्यून स्पोटीफाय,शाह्जाम,अॅपल म्युझिक साउंड क्लाउड यासारख्या आंतरराष्ट्रीय म्युझिक साईटवर उपलब्ध झालय आणि सध्या ते खूपच गाजतंय.
महिलांवर होणारे अत्याचार हे सहन न होणारे आहेत.खऱ्या अर्थाने एक स्त्रीच हे जग चालविण्याचे काम करते.स्त्री आता मुलगी,पत्नी,आई,सून एवढ्या चौकटीत न रहाता तिने आपली ओळख मार्गदर्शक,लेखिका,वैज्ञानिक,रक्षणकर्ती म्हणून जगात दाखविली आहे.जगासमोर ती खंबीरपणे उभी आहे.हेच या व्हिडीओ सॉंग च्या माध्यमातून दाखविले आहे.अशी माहिती बंडचे निर्मिती प्रमुख प्रथमेश देसाई,सोहम येवले,अक्षय पाटील,अनुराग राठोड,शिवराज गुरबक्षाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.व्हिडीओ चे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरात झाले आहे.गोवा,मुंबई,पुणे,हैद्राबाद आणि बेंगलोर याठिकाणी या बँडला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.नुकतेच याचा लोकार्पण सोहळा पार पडला.यात मिस इंडिया २०१६ हेमल इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच यांच्यासह आर्किटेक निहारिका शिंदे,मैत्री पाटील,प्राजक्ता पाटील,पर्यावरण तज्ञ गौरिका दिगे यांच्यासह मान्यवर संगीत प्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply