
कोल्हापूर: राजकारण म्हटले की छक्के-पंजे आणि हेवेदावे.सत्ताधारी आणि खुर्चीसाठी एकमेकांचे पाय ओढणारे पुढारी आणि राजकारणी लोकांवर निशाणा साधणारा धम्माल विनोदी मराठी चित्रपट ‘गाव थोर पुढारी चोर’येत्या १७ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि आपण कोणाला निवडून द्यावे याची जाणीव जनतेला या चित्रपटाच्या माध्यमातून होणर आहे.विनोद आणि मनोरंजन यातून जनतेला आपण कुठल्या योग्य उमेदवारांना निवडून द्यायचे अशी शिकवण मिळणार आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक पितांबर काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चित्रपटात दिगंबर नाईक प्रमुख भूमिकेत आहे.प्रथमच मी अश्या प्रमुख भूमिकेत आहे.याचा खरच खूप आनंद होतोय अशी भावना विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना व्यक्त केली.लोकांना या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय कर्तव्याची जाणीव होईल असेही ते म्हणाले.चित्रपटात चेतन दळवी,अभिनेत्री प्रेमा किरण,सिया पाटील,जयराज नायर,प्रकाश धोत्रे,सुनील गोडबोले,पराग चौधरी,सोमनाथ शेलार,दत्ता थोरात,अरुण खंडागळे यांच्या भूमिका आहेत.संगीत नंदू होनप यांचे आहे.चित्रपटातील गाणी वैशाली सामंत,सुदेश भोसले,नेहा राजपाल आणि सिद्धांत भोसले यांनी गायलेली आहेत.कथा आणि संवाद आबा गायकवाड यांचे आहेत.
पश्चिम महारष्ट्रातील मातीतला हा चित्रपट ग्रामीण भागातील राजकारण आणि कुरघोडी यांचे कथानक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास दिग्दर्शक पितांबर काळे,निर्माते मंगेश डोईफोडे आणि सर्व कलाकार यांनी यावेळी व्यक्त केला.पत्रकार परिषदेला चित्रपटाची संपूर्ण टीम.सह कलाकार उपस्थित होते.
Leave a Reply