कोल्हापूर :पार्थ प्रोडक्शन्स, गुर्जित सिंग बिंद्रा प्रस्तुत आणि एआरबी ९ फिल्म्स निर्मित जर्नी प्रेमाची या आगामी मराठी चित्रपटाची टीम नुकतीच प्रमोशन करिता शहरात आली असता प्रसार माध्यमांशी टिमने दिलखुलास गप्पा मारल्या. “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं” असं पाडगावकर म्हणतात खरं, पण प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी खूप वेग-वेगळी असते. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो. अलगद हळुवारपणे नकळत उलगडणारी ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी डोकावतेचं. प्रेमाचे रंग, रूपं अनेक आहेत. फेब्रुवारी महिना आला की या प्रेमाच्या रंगांना आणखीन उधाण येतं. म्हणूनच प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जाणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यात येत्या १७ तारखेला जर्नी प्रेमाची हा एक नवीन प्रेम प्रवास असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे.
जर्नी प्रेमाची” चित्रपटातील सर्व गाणी संगीतकार निखिल कामत यांनी संगीतबद्ध केलेली असून प्रसिद्ध गायक जावेद अली ,अवधूत गुप्ते, पूरन शिवा, पल्लवी रॉय अॅनी चॅटर्जी यांनी सर्व गाणी गायली आहेत.
जर्नी प्रेमाची या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत माधव देवचक्के (सरस्वती- कलर्स मराठी फेम), अभिषेक सेठिया, काश्मीरा कुलकर्णी यांची प्रेम कहानी दिसणार असून झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी ह्या सिनेमाद्वारे पदार्पण करीत असून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.सोबत आश्लेषा सिंग, वर्षा एरणकर, अतुल अभ्यंकर, पराग बेडेकर यांचाही महत्वपूर्ण भूमिका आहेत.मालिकांद्वारे घरा घरात पोहचलेले गुणी दिग्दर्शक अमोल भावे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, संवादही त्यांनीच लिहिले आहेत. कथा पटकथा राहुल पंडित, हिलाल अहमद व दिनेश देवळेकर यांनी लिहिली आहे. नृत्य दिग्दर्शन विकी खान यांचे असून, कला दिग्दर्शन संदेश निटोरी यांचे आहे. संकलन जफर सुल्तान यांचे असून वेशभूषा एकता भट यांनी केली आहे.
जर्नी प्रेमाची येत्या 17 फेब्रुवारीला रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याचे प्रस्तुतकर्ता पार्थ शाह व निर्माते आदिल बलोच यांनी सांगितले.अस्सल प्रेमाची उधळण असणारा हा रोमंटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला.
Leave a Reply